Assembly Session : अध्यक्षांच्या खुर्चीवरून चेतन तुपे हे काय बोलले? नार्वेकरांचाही चेहरा उतरला, नाराजी अन् कारवाईचे संकेत...

Chetan Tupe's Controversial Remarks on Opposition : शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात विधानसभेतील चर्चेदरम्यान तुपे यांनी विरोधकांबाबत आपली भूमिका मांडली होती.
Chetan Tupe Rahul Narwekar
Chetan Tupe Rahul NarwekarSarkarnama
Published on
Updated on

बातमीत थोडक्यात काय?

  • विधानसभा अध्यक्षपद भूषवताना चेतन तुपे यांनी विरोधकांवर केलेल्या वक्तव्यांमुळे तीव्र वादंग निर्माण झाला.

  • काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात तुपेंच्या विधानांचे वाचन करत निषेध नोंदवला आणि अध्यक्ष नार्वेकरांनीही नाराजी व्यक्त करत कारवाईचे संकेत दिले.

  • विरोधी पक्ष नेत्यांनी तालिका अध्यक्षांनी राजकीय हेतूने आसनाचा वापर केल्याचे सांगत विधानसभेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न उपस्थित केला.

Assembly Speaker Expresses Displeasure : विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान शुक्रवारी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्याविरोधात विरोधकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तालिका अध्यक्ष असताना त्यांनी केलेल्या विधानांवर विरोधक चांगलेच संतापले होते. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरच सभागृहात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तुपेंच्या प्रत्येक विधान वाचून दाखविले. त्यानंतर नार्वेकरांनीही त्याची दखल घेत नाराजी व्यक्त केली अन् कारवाईचे संकेत दिले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात विधानसभेतील चर्चेदरम्यान तुपे यांनी विरोधकांबाबत आपली भूमिका मांडली होती. वडेट्टीवारांनी त्यातील विधाने नार्वेकरांसमोरच वाचून दाखवली. वडेट्टीवार चांगलेच संतापले होते. याठिकाणी अनेक तालिका अध्यक्ष म्हणून बसले आहेत. अशाप्रकार यापूर्वी कधी पाहिला नाही. त्या पदाची गरिमा आहे, असे ते म्हणाले.

तालिका अध्यक्ष असले तरी त्यांना अध्यक्ष म्हणूनच मान देतो. पण अशा प्रकारे जर राजकीय भाषण होत असेल, खुर्चीवर बसून जर कोणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर ते योग्य आहे का, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला. सुनिल प्रभू यांचे वडील वारले होते, त्यामुळे सर्व सदस्य सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत. असे असूनही अशी भूमिका मांडणे योग्य आहे का, असे राजकीय वक्तव्य करणाऱ्या तालिका अध्यक्षांना यापुढे त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का, याचाही खुलासा व्हावा, असे संताप वडेट्टीवारांनी व्यक्त केला.

Chetan Tupe Rahul Narwekar
Bihar Assembly Election : ...तर भाजपसोबत असलेल्या नितीश कुमारांच्या पक्षात मोठी फूट; आमदाराच्या दाव्याने बिहारमध्ये खळबळ

आमदार भास्कर जाधव व नाना पटोलेंनी आपली नाराजी व्यक्त केली. त्या खुर्चीवर बसून आमच्यावर शेरेबाजी केली जाते, ते योग्य नाही. अध्यक्षांनी जर अशापध्दतीने आमच्यावर टीका केली तर सभागृहाबाहेर आमची प्रतिमा काय होईल. म्हणून त्यांना कडक शब्दांत समज देणे गरजेचे आहे, अशी मागणी जाधव यांनी केली.

विरोधी पक्षातील नेत्यांच्या या भावना ऐकून घेतल्यानंतर नार्वेकरांनीही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, महाराष्ट्र विधिमंडळ हे देशातील सर्वात प्रीमियम म्हणून उल्लेख केला जातो. त्यामुळे त्याची गरिमा कायम ठेवणे हे सर्वांचीच जबाबदारी आहे. विशेष करून या आसनावर जी व्यक्ती असते, त्यांची अधिक जबाबदारी असते. आसनावर बसलेल्या व्यक्तीने केलेल्या संभाषणाबद्द्ल चर्चा घडवून आणणे, हे यापूर्वी कधी झाले नाही आणि यापुढेही होऊ नये, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.

Chetan Tupe Rahul Narwekar
PM Modi in Ghana : मोदींनी भारतातील राजकीय पक्षांची माहिती देताच घानाची संसद हबकली; भाषण थांबवले अन् पाहतच राहिले...

तुम्ही मांडलेला मुद्द्याची माहिती घेऊन मी माझ्या दालनात योग्य ती कारवाई करण्याची भूमिका घेईन, असे नार्वेकरांनी स्पष्ट केले. अध्यक्षांनी कसे भाषण करावे, हे नियमांत जरी लिहिले नसले तरी त्या अध्यक्षांची जबाबदारी आहे की, या नियमांतील स्पिरीट ओळखून त्याच्या चौकटीत राहून काम करणे, हे आवश्यक आहे. याची जाणीव मला आहे. या आसनावर जो कोणी तालिका अध्यक्ष म्हणून विराजमान होईल, त्यांनाही माझी विनंती राहील, जे नियमांत नसेल ते तुमच्या स्पिरीट मधून दिसून येऊद्या. सभागृहात कुठल्याही परिस्थितीत या आसनाचा उपयोग राजकीय हेतूने किंवा दृष्टीने केला जाणार नाही, असे आश्वासनही नार्वेकरांनी देले.

काय म्हणाले होते चेतन तुपे?

विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात वाचून दाखविल्यानुसार, ‘विरोधकांनी तीन दिवस गोंधळ घातला आणि हा प्रस्ताव आणला. आजही लक्षवेधी सूचना न होऊ देता चर्चेचा आग्रह धरला. सरकार पक्षाचे मंत्री आणि सर्वजण या चर्चेत उपस्थित आहेत. पण स्वत:च्या पोटाला चिमटा घेण्यास विरोधक तयार नव्हते. भूक लागल्यावर जो तो निघून जातो, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे किती आवश्यक आहे आणि राजकारणी किती नाटकी आहेत, हे या प्रकारावरून दिसते, असाही खोचक टोला काही सदस्यांनी लगावला होता. त्यामुळे हे सभागृह चर्चेचे आहे, कायदेमंडळ आहे, येथे चर्चा होते, सरकार चर्चेसाठी तयार आहे, असे तुपे म्हणाले होते.

आजही सर्वजण बसून आहेत. मंत्री महोदय बसून आहेत. मध्यरात्रीपर्यंत चर्चा करण्याची तयारी आहे. पण दुर्दैवाने माझ्यासमोर अनेक नावे आली आहेत, ते मी वाचतो. पण ते आज येथे उपस्थित नाहीत. त्यामध्ये बापूसाहेब पठारे, बाबासाहेब देशमुख, अभिजित पाटील, अबू आझमी, रईस शेख, महेश सावंत, अनंत नर हेही उपस्थित नाहीत. त्यामुळे नक्की काय समजायचं, असे तुपे म्हणाल्याचे वडेट्टीवारांनी सांगितले.

आज सकाळी सभागृहाची विशेष बैठक होती. अध्यक्ष म्हणून मी सभागृहात सकाळी नऊ वाजल्यापासून उपस्थित आहे. आता १३ तास झाले, मी या सभागृहाच्या लॉबीच्या बाहेर गेलेलो नाही. मी जर बसू शकतो, तर ज्यांनी प्रस्ताव आणला ते का बसू शकत नाहीत. शेतकऱ्यांसारख्या विषयावर चांगल्या सूचना कोणत्या येत आहेत आणि शेतकरी हिताचे उद्या आपल्याला काय बोलायचे आहे, हे का ऐकू शकत नाहीत, हा प्रश्न अध्यक्ष म्हणून मलाही पडलेला आहे. त्यामुळे असो हे मगरीचे अश्रू सुरू आहेत की काय, की केवळ राजकारण करायचे आहे, हे बघून वाटू लागले आहे. ठीक आहे ज्यांचे त्यांच्यापाशी. शेतकरी निर्णय घेतील, असे वडेट्टीवारांनी वाचून दाखविले. 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

  • प्रश्न: चेतन तुपेंविरोधात नाराजी का व्यक्त करण्यात आली?
    उत्तर: विरोधकांवर आसनावरून राजकीय वक्तव्य केल्यामुळे नाराजी व्यक्त झाली.

  • प्रश्न: अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणावर काय भूमिका घेतली?
    उत्तर: त्यांनी तुपेंच्या विधानांवर नाराजी व्यक्त करून योग्य ती कारवाई होईल असे सांगितले.

  • प्रश्न: विरोधी पक्ष नेत्यांची काय प्रमुख तक्रार होती?
    उत्तर: तालिका अध्यक्षांनी पक्षीय भूमिकेने आसनाचा गैरवापर केल्याची तक्रार होती.

  • प्रश्न: चेतन तुपे यांनी नेमके काय विधान केले होते?
    उत्तर: त्यांनी विरोधकांवर ‘राजकारण नाटकी आहे’ असा खोचक आरोप करत उपस्थित नसल्यावर टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com