Eknath Shinde hands over a newly built home to Adil Shah’s family, honoring the Pahalgam hero’s sacrifice. Sarkarnama
देश

Pahalgam Attack : अखेर DCM एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये जीवाची बाजी लावणाऱ्या आदिल शाहच्या कुटुंबाचं मोठं स्वप्नं पूर्ण, घरात झळकला फोटो...

Eknath Shinde Builds Home for Pahalgam Hero Adil Shah : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या शब्दानुसार आदील हुसेन शाह यांच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून नवीन घर बांधून देण्यात आलं आहे. या घरासाठी 10 ते 12 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Jagdish Patil

Eknath Shinde builds Adil Shah house : मागील वर्षी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर भ्याड दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्या दरम्यान स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकां रक्षणासाठी धावून गेलेल्या आदिल सय्यद शाह या स्थानिक युवकाचा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर या युवकाच्या धाडसाचं संपूर्ण देशभरातून कौतुक केलं जात होतं. शिवाय त्याच्या मृत्यूवर हळहळ देखील व्यक्त केली जात होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आदिल शाह यांच्या शौर्याचं कौतुक करत त्यांनी त्याच्या कुटुंबीयांसाठी वैयक्तिकरित्या पाच लाखांची मदत केली होती.

याचवेळी त्यांनी आदिल शाहच्या कुटुंबाचे मोडकळीस आलेले घर नव्याने बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं. अशातच आता पहलगाम हल्ल्याला उद्या वर्ष होणार असून यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पाळल्याचं समोर आलं आहे.

कारण शिंदेंनी दिलेल्या शब्दानुसार आदील हुसेन शाह यांच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून नवीन घर बांधून देण्यात आलं आहे. या घरासाठी 10 ते 12 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. सिमेंट-काँक्रीटचं हे एक मजली घर असून त्यामध्ये प्रशस्त हॉल, स्वयंपाकघर, दोन बेडरूम आणि स्वच्छतागृहाची सुविधा देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदेंनी आपला शब्द खरा केल्याचं आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शिवाय एका युवकाच्या धाडसाचं त्यांनी योग्य सन्मान केल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, आदील यांचे वडील इक्बाल शहा यांनी शिवसेनेचे आभार मानत भावनिक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "पर्यटकांनी घाबरू नये, पुन्हा इथं यावं, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. आमच्या मुलाने देशासाठी बलिदान दिल्याचा आम्हाला अभिमान आहे, असं ते म्हणाले.

तर याचवेळी शिवसेनेचे आभार मानत त्यांनी बांधून दिलेलं घर कुटुंबासाठी मोठा आधार असल्याची भावना व्यक्त केली. दरम्यान, युवा सेनेचे मराठवाडा विस्तारक बाजीराव चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून हे घर बांधण्यात आलं असून या घराचा ताबा आज सय्यद कुटुंबियांना देण्यात येणार आहे. शिवसेना नेते योगेश कदम आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत या घराचा ताबा देण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT