West Bengal News: पश्चिम बंगालच्या राजकारणातील पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीत टीएमसीनं सत्ता गमावल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या 20 बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गट करत नॅशनलिस्ट सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन होण्याच्या निर्णय घेतला होता. मात्र,आता निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का दिला आहे.
निवडणूक आयोगानं गुरुवारी(ता.17 सप्टेंबर) दिलेल्या अंतरिम आदेशानुसार तृणमूल काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आल्याचं समोर येत आहे. टीएमसीचा ममता बॅनर्जींचा गट आणि ऋतब्रत बॅनर्जी यांच्यासह बंडखोरांचा गट या दोघांनाही आगामी पोटनिवडणुकीत 'अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस'हे नाव आणि पक्षचिन्ह वापरता येणार नसल्याचं निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात म्हटलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून याचदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना नवीन नाव आणि चिन्हासाठी प्रत्येकी तीन पर्याय शुक्रवारी(ता.18) सकाळी 11 वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत
पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा धक्कादायक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसच्या 20 बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गट करत नॅशनलिस्ट सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन होण्याच्या निर्णय घेतला होता. पण त्यापैकी 17 खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोटही त्यांच्यापैकीच एका खासदाराने केला होता. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
एनसीपीच्या १७ खासदारांनी एकत्रितपणे भाजपमध्ये प्रवेश करण्याचे ठरविल्याची माहिती समोर येत आहे. दोन तृतियांशहून अधिक खासदार पक्षांतर करत असलेल्या पक्षांतरबंदी कायदा लागू होणार नाही. तर अबू ताहेर खान, खलीलुर रहमान आणि यूसुफ पठाण हे तीन खासदार थेट भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचीही चर्चा आहे. त्यांच्या मतदारसंघात मुस्लिम बहुल भाग मोठा आहे. त्यामुळे त्यांना अडचणीचे होऊ सकते. मात्र, त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी टाकली जाऊ शकते, असेही बर्मा यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.