Gokul Election : गोकुळमधील अदृश्य शक्तींचा पहिल्यांदा भांडाफोड : हसन मुश्रीफांचे धनंजय महाडिकांवर नाव घेऊन आरोप

Hasan Mushrif Statement: गोकुळ दूध संस्थांच्या पात्र-अपात्रतेवरून महायुतीतील संघर्ष सुरू असताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत संस्थांची संख्या कमी करण्याच्या प्रयत्नांचा आरोप केला.
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Hasan Mushrif Statement: गोकुळ दूध संस्थांच्या संस्था पात्र अपात्रतेवरून महायुतीमधील सुरू असलेला संघर्ष अजूनही सुरु आहे. अदृश्य शक्तीकडून झालेल्या त्रासाबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांनी सातत्याने आपल्याला या शक्तीचा त्रास झाल्याच सांगितले आहे. अदृश्य शक्ती कडून होत असलेल्या संस्थेच्या तक्रारीवर न्यायालयीन लढासह मानसिक त्रास देखील सहन करावा लागला.

झालेल्या त्रासाबद्दल चौदाशे दूध संस्थांनी या अदृश्य शक्तीच्या विरोधात मेळावा घेत त्यांना विरोध केला. मात्र ही अदृश्य शक्ती कोण याबाबत अद्यापही कोणीही जाहीरपणे नामोल्लेख केला नव्हता. त्यामुळे अदृश्य शक्ती कोण? असा सवाल उपस्थित होत होता. मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीच याबाबत भांडाफोड केला आहे.

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी प्रसिद्धी केलेल्या पत्रकावर बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी या अदृश्य शक्तीचा भांडाफोड केला आहे.अपात्र केल्या संस्था राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्यच्या 75 टक्के संस्था यामध्ये होत्या. 15 टक्के संस्था या काँग्रेसच्या होत्या. या संस्था वाचवण्याचा प्रयत्न आम्हालाच करावा लागला. कोण काय बोलण्यापेक्षा महायुती जिंकून येणार आहे. त्यांच्या पत्रकामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा कोणताच पडणार नाही.

Hasan Mushrif
Gokul election : 'गोकुळ'मध्ये हसन मुश्रीफच 'बाजीगर'; अदृश्य शक्तीला रोखलं, पण खरी परीक्षा तर...

आमच्या संस्था कशा कमी होतील. आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल, त्यांची कशी वाढवता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केला. पण आमची सदस्य संख्या कशी जास्त राहील यासाठी आम्ही प्रयत्न केला. या सर्व प्रकरणामुळे काही संस्थांची नाराजी असणार आहे .ती आम्ही दूर करू, असेही मुश्रीफ म्हणाले

Hasan Mushrif
Hasan Mushrif : संस्थांच्या लढ्यात सतेज पाटलांचं 'झिरो' योगदान, हसन मुश्रीफांचा हल्लाबोल; आमच्या खांद्यावर बसून कोर्टात गेले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com