Rahul Gandhi affidavit Sarkarnama
देश

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या हरयाणातील मत चोरीच्या आरोपांचं निवडणूक आयोगाकडून पुन्हा खंडन; सांगितलं नेमकं काय झालंय?

Rahul Gandhi: पण निवडणूक आयोगानं नेहमीप्रमाणं राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावत हा नेमका काय प्रकार आहे याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे.

Amit Ujagare

Rahul Gandhi: लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत यावेळी हरयाणाच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या कथित मतचोरीच्या घटनांचा पुराव्यांसह पर्दाफाश केला. पण निवडणूक आयोगानं नेहमीप्रमाणं राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावत हा नेमका काय प्रकार आहे याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे.

राहुल गांधींनी नेमके काय आरोप केले?

राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत आरोप केला की, गेल्या हरयाणा विधानसभा निवडणूक मतांचा घोटाळा करुन भाजपच्या बाजूनं करण्यात आली. यावेळी निवडणूक आयोग आणि भाजपामध्ये मिलिभगत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधींनी दावा केला की, हरयाणामध्ये २५ लाख मतांची चोरी करण्यात आली. यांपैकी ५.२१ लाख डुप्लिकेट मतदार होते. तसंच यामध्ये ९३,१७४ अमान्य मतदार आणि १९.२६ लाख बल्क मतदारही होते. त्यांनी हा देखील आरोप केला की, भाजपशी संबंधित हजारो लोक हरयाणा आणि उत्तर प्रदेश अशा दोन्ही ठिकणी मतदान केलं. हरयाणा विधानसभेच्या २०२४ च्या निवडणूक निकलात भाजपला ४८ जागा काँग्रेसला ३७ जागा आणि आयएनएलडी या पक्षाला २ जागा तर अपक्षांना ३ जागा मिळाल्या होत्या.

आयोगाकडून आरोपांचं पुन्हा खंडण

निवडणूक आयोगानं राहुल गांधींच्या या आरोपांचं खंडण केलं आहे. त्यांनी म्हटलं की, इंडियन नॅशल कँग्रेसच्या बुथ लेव्हल एजंटनं सुधारणा करताना एकाच नावाच्या एकाहून अधिक नावनोंदणी रोखण्यासाठी कोणताही दावा किंवा आक्षेप का नोंदवला नाही? यांसदर्भात एकाहून अधिक एकाच नवाचे मतदार मतदार यादीत आढळून आले होते तर त्याविरोधात अपिल का केलं गेलं नाही? सध्या पंजाब-हरयाणा कोर्टात केवळ २२ निवडणूक याचिका प्रलंबित आहेत. निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर ४५ दिवसांमध्ये संबंधित हायकोर्टात निवडणूक याचिका दाखल करता येते. दुसऱ्या एका निवडणूक अधिकाऱ्यानं म्हटलं की, काँग्रेसचे पोलिंग एजंट मतदान केंद्रांवर काय करत होते? जर कुठला मतदार आधीच मतदान करुन गेला तर किंवा त्याच्या ओळखपत्रावर संशय असेल तर त्यावर आक्षेप नोंदवणं त्यांचं काम आहे.

पुन्हा SIR चं महत्व सांगितलं

अधिकाऱ्यांनी म्हटलं की, निवडणूक आयोगाची विशेष मतदार यादी पडताळणी मोहिमेचा उद्देश मृत, दुबार मतदार तसंच स्थलांतरीत मतदारांना हटवणं आणि त्यांचं राष्ट्रीयत्वाची खात्री करणं आहे. त्यामुळं एका अधिकाऱ्यानं म्हटलं की, राहुल गांधी या SIR प्रक्रियेचं समर्थन करतात की नाही? हे त्यांनी स्पष्ट करावं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT