MNS: "अतिरेक्याना जात-धर्म नसतो तसा बोगस मतदारालाही जात-धर्म नसतो"; मनसेनं आशिष शेलारांना जोरदार प्रत्युत्तर

MNS Vs Ashish Shelar : ठाकरे बंधुंच्या मुंबईतील मतचोरीच्या मुद्दावर काढलेल्या रॅलीला आशिष शेलारांनी अर्थात भाजपनं प्रेस घेऊन 'वोट जिहाद'चा मुद्दा उपस्थित केला होता.
Ashish Shelar praises Raj Thackeray
Ashish Shelar praises Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

MNS Vs Ashish Shelar : भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत मनसेवर हल्लाबोल केला होता. मनसेनं मुंबईत काढलेल्या कथित वोट चोरी विरोधातील मोर्चात त्यांनी केवळ मराठी माणसं आणि दलित मतदारांमधील दुबार नावं जाहीर केली. मुस्लिमांची दुबार नावं का जाहीर केली नाहीत. असा मुद्दा उपस्थित करत वोट जिहादचा मुद्दा उकरुन काढला होता. त्यांच्या या आरोपाला मनसेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांच्या वोट जिहादच्या मुद्द्याला सडेतोड उत्तर देताना मनसेचे प्रवक्ते सरचिटणीस हेमंतकुमार कांबळे यांनी म्हटलं की, "भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. बोगस मतदारांना त्यांनी 'वोट जिहाद' म्हटलं. आम्ही केवळ बोगस मतदार म्हटलं. त्यांनी यामध्ये बोगस मुस्लिम मतदारांचा मुद्दा उकरुन काढला. म्हणजेच हे देखील बोगस मतदार आहेत. पण जशी अतिरेक्यांना जात-धर्म नसतो तसा बोगस मतदाराला जात-धर्म नसतो असं आमचं म्हणणे आहे. भाजपला जर मुस्लिमांचा एवढा तिटकारा असेल तर त्यांचा अल्पसंख्यांक सेल का आहे? महाराष्ट्रात मुंबईत मराठी माणसाला एका विशिष्ट समाजाकडून, बिल्डरकडून घर नाकारलं जातं तो वोट जिहाद नाही का?

"तुमचं जे ब्रीद वाक्य आहे 'जस्टिस फॉर ऑल' हे चुकीचं ठरत आहे. गुजराती-राजस्थानी-मारवाडी लोकांसाठी तुम्ही मैदानात उतरत असाल तर हे तुष्टीकरण नाही का? मुंबई, महाराष्ट्र सोडून असा कोणत्या राज्यात तुमचा उत्तर भारतीय मोर्चा आहे का? गुजराती सेल इतर कोणत्या राज्यात आहे का? राजस्थान प्रकोष्ठ इतर कोणत्या राज्यात आहेत? महाराष्ट्र सोडून तुम्ही त्यांना कुठे प्रतिनिधित्व दिले का?" असाही प्रश्न कांबळे यांनी उपस्थित करून शेलारांना आणि भाजपला मनसेनं जशास तसं उत्तर दिलं आहे.

दरम्यान, विरोधकांनी वारंवार मतदार याद्यांमधील घोळांबाबत निवेदनं देऊन, आंदोलनं करुन, मोर्चे काढूनही मतदार याद्यांचं शुद्धीकरण न करताच निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील 288 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या. मात्र, निवडणूक आयोगाच्या या घोळावर आता मनसेने आक्षेप घेत निशाणा साधला आहे. दुबार मतदारांच्या प्रश्नावरून निवडणूक आयोगाने दोन स्टार विचार मांडला आहे. मात्र, यावरूनच चिडलेल्या मनसेने निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचणारा आयोग असून त्यालाच आता 'रॉकस्टार' दिला गेला पाहिजे, अशाही शब्दांत मनसेचे सरचिटणीस हेमंतकुमार कांबळे यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com