Election Commission Of India Sarkarnama
देश

Election Commission Of India : मध्य प्रदेश, छत्तीसगडसह पाच राज्यांत धुरळा; निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार

Sunil Balasaheb Dhumal

Delhi Political News : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा सोमवारी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकांच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. या पाच राज्यांत दिवाळीनंतर फटाके फुटणार आहेत. नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला मतदान होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. (Latest Political News)

मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, मिनी लोकसभेची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जात असून, संबंधित राज्यात भाजप आणि काँग्रेसप्रणित आघाडीच्या वतीने जोर लावला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांच्या निवडणुका एकाच टप्प्यात तर छत्तीसगडची दोन टप्प्यांत मतदान होऊ शकते.

मुख्य निवडणूक आयुक्त यांनी राज्य निवडणूक आयुक्त व राज्यातील निवडणुका अधिकारी व परीक्षकांची नुकतीच बैठक घेतली होती. त्यानुसार दिवाळीनंतर २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मतदानानंतर मतमोजणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्याच्या तयारीचा आढावा निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला होता. (Maharashtra Political News)

दरम्यान, सोमवारी पत्रकार परिषदेत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होणार आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक ही घोषणा होताच त्या ठिकाणी आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे येथील विकासकामांना आता बंधने येणार आहेत. त्यासोबतच या निवडणुकीनंतर देशातील लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने या निवडणूक निकालाचा परिणाम त्यावर पाहावयास मिळणार असल्याने या विधानसभेच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT