NCP Crisis : शरद पवार-अजितदादा आमनेसामने; सर्वोच्च न्यायालय अन् निवडणूक आयोगात आज सुनावणी

Sharad Pawar Vs Ajit Pawar : आमचेही म्हणणे ऐकून घ्या, अजित पवार गटाचे कॅव्हेट
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Delhi Political News : राष्ट्रवादीच्या दोन सुनावणी सोमवारी एकत्र पार पडणार आहेत. बंडखोर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या विरोधात अपात्रतेची याचिका शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. याची सुनावणी आज होणार आहे, तर दुसरी सुनावणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत निवडणूक आयोगात होणार आहे. या दोन्ही सुनावणींकडे राज्याचे लक्ष आहे.

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाने शरद पवारांवर हुकूमशाहीचा आरोप केला. पवारांनी एकतर्फी फक्त पत्र काढून पक्षातील नियुक्त्या केल्याचा दावा बंडखोर गटाकडून करण्यात आला, तर शरद पवार गटाने पक्षाचे चिन्ह घड्याळ हे गोठवू नये, अशी मागणी आयोगाकडे केली. त्यामुळे आजच्या सुनावणीत आणखी काय भर पडणार, अशी चर्चा आहे.

(Latest Political News)

Sharad Pawar, Ajit Pawar
Gondia Congress News : प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार; तालुकाध्यक्षांसह तीनशे कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

राष्ट्रवादीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी २४ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात आमच्या पहिल्या अपात्रतेच्या याचिकेनंतरही तीन महिन्यांत काहीही निर्णय घेतला नसल्याने विधानसभा अध्यक्षांनी निर्देश देण्याची मागणी केल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादीने बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसाठी तीन याचिका दाखल केल्या आहेत. (Maharashtra Political News)

पहिली याचिका अजित पवारांसह नऊ आमदारांविरोधात, दुसरी याचिका २० आमदारांविरोधात आणि तिसरी याचिका ११ आमदारांविरोधात दाखल करण्यात आली होती. 'अध्यक्ष अजित गटाच्या बाजूने स्पीकर निर्णय घेईल याची भीती असल्याने आमच्या खटल्याचा वेग वाढवणे हा याचिकेचा उद्देश आहे. यामुळे आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जाण्यास मदत होईल. तसेच विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आमच्या विरोधात असेल तर त्यांना अल्पावधीत अपात्र ठरविण्यात मदत होईल', अशी माहिती राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आली.

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गटानेही सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी याला दुजोरा दिला. 'शरद पवारांनी याचिका दाखल केल्यामुळे आम्ही कोर्टाला आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश देऊ नये, असे कॅव्हेट सादर केले आहे,' असे पटेलांनी स्पष्ट केले.

शरद पवारांच्या (Sharad Pawar) याचिकांमुळे काहीही होणार नसल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला जात आहे. 'शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. याचा अर्थ आताही याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त, सर्वोच्च न्यायालय नार्वेकरांना वाजवी वेळेत निर्णय देण्यास सांगेल आणि पुढच्या वर्षी कधीही निवडणुका होऊ शकतात, असा विश्वासही अजित पवार गोटातून व्यक्त केला जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar, Ajit Pawar
Ramdas Kadam News : "...म्हणूनच उद्धव ठाकरेंनी माझ्यावर डूख धरला होता!"; रामदास कदमांचा नवा गौप्यस्फोट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com