Election Commission Order: भारतीय निवडणूक आयोग सध्या विशेष मतदार फेरपडताळी अर्थात SIR मधील कठोर निर्णयामुळं चर्चेत आहे. त्याचबरोबर अधुनमधून आपल्या अजब निर्णयामुळं देखील निवडणूक आयोग विरोधकांच्या टार्गेटरवर असतं. त्यातच आता पुन्हा एकदा एका नव्या आदेशामुळं आयोगाला टीकेचा सामना करावा लागतो आहे. आयोगानं पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानापूर्वी दुचाकीवरुन प्रवास करण्यावर बंदी घातली आहे.
निवडणूक आयोगानं मतदानाच्या आदल्या दिवशी बाईक रॅली काढणं, तसंच दिवसा दुचाकीवरुन डबलसीट प्रवास करण्यावर तसंच रात्रीच्यावेळी दुचाकीवरुन प्रवासाला बंदी घातली आहे. आज मंगळवारपासून हा आदेश लागू करण्यात आला आहे. म्हणजेच मतदान होईपर्यंत दोन दिवस हा नियम लागू असणार आहे. पश्चिम बंगालमध्ये २३ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात होणाऱ्या सर्व १५२ विधानसभा मतदारसंघात हा नियम लागू असणार आहे.
आयोगाच्या आदेशानुसार, मतदानाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ६ ते पहाटे ६ वाजेपर्यंत बाईक्स आणि स्कुटरवरुन प्रवास करता येणार नाही. केवळ आपत्कालीन परिस्थितीत जसं की वैद्यकीय मदत किंवा कौटुंबिक कार्यक्रमासाठीच केवळ दुचाकी वापरता येणार आहे. त्याचबरोबर मतदानाच्या आदल्यादिवशी बाईक रॅलीज काढता येणार नाहीत. दुसऱ्या दिवशी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत अडथळा किंवा गैरप्रकार होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी पहाटे ६ वाजल्यापासून रात्री ६ वाजेपर्यंत दुचाकीवरुन फिरता येणार नाही. म्हणजेच या काळात डबलसीट प्रवासाला बंदी असेल. यामध्येही वैद्यकीय इमर्जन्सीसाठी, कौटुंबिक कार्यक्रमांसाठी तसंच शाळेय विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासोडण्यासाठीच वापर करता येणार आहे. मतदानाच्या दिवशी केवळ कौटुंबातील व्यक्तीच दुचाकीवरुन प्रवास करु शकतात. आयोगानं म्हटलं की, मतदान प्रक्रिया शांत आणि सुरक्षित वातावरणात व्हाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं आहे. यामध्ये अपवादाची गोष्ट अशी की, जर अत्यावश्यक सेवेसाठी दुचाकीवरुन डबलसीट प्रवास करायचा असेल तर स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये याबाबत अर्ज सादर करुन त्यांची परवानगी घ्यावी लागेल.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये येत्या २३ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञीनेश कुमार यांनी सांगितलं की, पश्चिम बंगालमध्ये मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही.
मतदार यादीच्या विशेष सखोल फेरपडताळणीवरून निवडणूक आयोग आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस यांच्यात सध्या संघर्ष सुरू आहे; भाजपने फायदा व्हावा या उद्देशाने निवडणूक आयोग जाणीवपूर्वक मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप या पक्षाने केला आहे. निवडणूक आयोग आणि भाजप या दोघांनीही हा आरोप फेटाळून लावला असून, तो पूर्णपणे निराधार असल्याचं म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.