Jay Pawar shares emotional Instagram tribute featuring Ajit Pawar’s photograph, recalling his confidence and legacy one month after his demise.
Jay Pawar shares emotional Instagram tribute featuring Ajit Pawar’s photograph, recalling his confidence and legacy one month after his demise.Sarkarnama

Jay Pawar Post : जय पवार यांची आणखीन एक भावनिक पोस्ट म्हणाले..., 'ती' फक्त हृदयात जपलेली एक वेदनादायी आठवण

Jay Pawar Remembers : अजित पवार यांच्या निधनानंतर महिन्यानंतरही जय पवार यांनी इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करत त्यांच्या आठवणी जागवल्या. कुटुंबीय अजूनही दुःखातून सावरत असल्याचे या पोस्टमधून दिसून आले.
Published on

Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर सबंध महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. अजितदादांच्या विमान अपघाताला एक महिना होत आला तरी दादा आपल्यात नाही ही कल्पना करवत नाही. तरी देखील सबंध महाराष्ट्राबरोबरच दादांच्या कुटुंबातील व्यक्ती देखील हे सत्य स्वीकारून पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. असं असलं तरी अजितदादा यांचे पुत्र जय पवार हे सातत्याने दादांच्या आठवणींना उजाळा देताना पाहायला मिळत आहेत.

काही दिवसांपूर्वी जय पवार यांनी त्यांच्या आई सुनेत्रा पवार यांचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यांत अजित पवार यांच्या आठवणीत अश्रू आल्याचे दिसत असून त्या खूपच भावनिक झाल्याचे दिसत होत्या.

हा क्षण जय पवार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. आणि या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये , 'Dad नेहमीच आपल्या हृदयात आहेत आणि Mom आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान आहे,' अशी भावना व्यक्त केली आहे.

दरम्यान जय पवार यांनी यापूर्वीही अजित पवार यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले होते. जय पवारांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर अजित पवारांचा एक व्हिडीओ शेअर करत 'डॅड तुमच्या आठवणी नेहमीच जपून ठेवेन. मिस यू डॅड' अशी पोस्ट शेअर केली होती.

Jay Pawar shares emotional Instagram tribute featuring Ajit Pawar’s photograph, recalling his confidence and legacy one month after his demise.
Pune Crime : 'नक्षलवाद्यांना तुला मारायला लावीन...', काँग्रेसच्या हनुमंत पवारांना मारहाण का केली? तुषार दामगुडेंनी स्पष्टच सांगितलं

त्यानंतर आज देखील जय पवार यांनी इंस्टाग्राम वरती एक स्टेटस ठेवला आहे. त्यामध्ये अजित दादांचा एक फोटो असून तुमचे डोळे आणि तुमचे तेजस्वी रूप पाहताना मनात एकच आस आठवण येते आहे.

Jay Pawar shares emotional Instagram tribute featuring Ajit Pawar’s photograph, recalling his confidence and legacy one month after his demise.
Pune News: तुमची गाडी 15 वर्षांपेक्षा जुनी आहे? मग पुण्यात येताना सावधान!

कधीतरी तुम्हाला व्यासपीठावर उभे राहून त्याच आत्मविश्वासाने व त्यास तळमळीने बोलताना पहावे पण आता ती फक्त हृदयात जपलेली एक वेदनादायी आठवण बनवून राहिली आहे. असं या पोस्टमध्ये जय पवार यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com