Election Commission  Sarkarnama
देश

Election Commission : 79 जागांवरील भाजपच्या विजयाबाबत स्वयंसेवी संस्थांचा 'तो' दावा निवडणूक आयोगाने फेटाळला!

Loksabha Election And BJP : यंदा लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणं शक्य झालेलं नाही, तर महाराष्ट्रात भाजपला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

सरकारनामा ब्यूरो

Election Commission on BJP victory in 79 Lok Sabha seats : लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर आलं आहे. देशात पुन्हा एकदा भाजप नेतृत्वातील एनडीए आघाडीने बहुमत सिद्ध केलं आहे. तर, भाजपला मात्र मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा चांगलाच फटका बसल्याचे दिसून आले आहे, कारण भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणं शक्य झालेलं नाही. महाराष्ट्रात तर भाजपला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

असे असतानाही 79 लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा विजय मतमोजणीतील हेराफेरीमुळे झाल्याचा आरोप केला गेला होता, त्यावर आता निवडणूक आयोगाचे म्हणणे समोर आले आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास 79 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचा(BJP) विजय मतमोजणीतील हेराफेरीमुळे झाल्याचा काही स्वयंसेवी संस्थांचा निष्कर्ष चुकीचा असल्याचा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाने केला आहे.

असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) व व्हॉईस फॉर डेमोक्रसी (व्हीएफडी) या दोन संस्थांनी मतदानाच्या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आकडे व मतदानानंतर काही दिवसांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने(Election Commission) जाहीर केलेल्या आकड्यांमधील तफावतींचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढले असून यात देशातील 543 मतदारसंघांपैकी 538 मतदारसंघांमध्ये एकूण मतदानामध्ये तफावत असल्याचे दिसून आले आहे.

भाजपने जिंकलेल्या 79 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या दिवशी जाहीर केलेले आकडे व काही दिवसांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकड्यांमध्ये जेवढी तफावत आहे. त्यापेक्षा कमी मताधिक्यांनी विजय मिळाल्याचा दावा या दोन्ही संस्थांनी केला आहे.

या दाव्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने एक्स या समाज माध्यमावर भूमिका मांडली आहे. उमेदवारवगळून काहीजण देशातील अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात मोहिम चालवित आहे. निवडणुकीची प्रक्रिया राबविताना निवडणूक आयोगाने मतदार व उमेदवारांना निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी करून घेतले आहे.

परंतु मतदानाच्या दिवशी सायंकाळी 7 वाजेपर्यंत अनेकदा नेमके आकडे केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचत नाही. अनेकदा त्यावेळी मतदारांच्या रांगा असतात परंतु त्यांचे मतदान व्हावयाचे असते. त्यामुळे मतदानाचा नेमका आकडा दुसऱ्या दिवशी मिळत असतो. असे आयोगाने म्हटले आहे.

मतदानाची आकडेवारी ही लोकप्रतिनिधी कायद्याच्या अधीन राहून एका पारदर्शक प्रक्रियेतून जाहीर केली जाते. यासंदर्भात उमेदवाराला काही संशय असल्यास त्यांना लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आव्हान देण्याची मुभा आहे. 2019 च्या निवडणुकीनंतर 138 लोकसभा मतदारसंघातील निकालाच्या विरोधात निवडणूक याचिका झाल्या होत्या. त्या तुलनेत 2024 च्या निवडणुकीनंतर कमी याचिका दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत 79 लोकसभा निकालाच्या संदर्भात याचिका दाखल झालेल्या आहेत,असेही केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT