Who Is army chief of Bangladesh : बांग्लादेश हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे. त्याचा परिणाम म्हणजे पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला असून आता लष्कर अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. बांग्लादेशाची देशाची कमान लष्कराच्या हाती येणार आहे.
शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर लष्करप्रमुख वकार उझ जमान यांनी पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास सांगितले आणि तुम्ही लोक आमच्यासोबत आलात तर आम्ही परिस्थिती बदलू, असेही सांगितले. भांडणे, अराजकता आणि संघर्षापासून दूर राहा. पत्रकार परिषदेत लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आणि त्यांनी सर्व पक्षांशी चर्चा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच बांग्लादेशमध्ये (Bangladesh) लवकरच अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याचंही लष्करप्रमुख वकार-उझ-जमान यांनी म्हटलं आहे.
बांग्लादेशात सुमारे 2 महिन्यांपासून आरक्षणाविरोधात हिंसक निदर्शने सुरू होती. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आंदोलकांशी कठोरपणे वागण्यास सुरुवात केल्यावर ते अधिक आक्रमक झाले. आरक्षणापासून दूर जात शेख हसीनाच्या (Sheikh Hasina) राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहिले आणि त्यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. हा वाट एवढा वाढला की पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देत देश सोडून भारतात यावे लागले.
लेफ्टनंट जनरल वकार-उझ- जमान यांची नुकतीच पदोन्नती मिळाली आहे. त्यामुळे त्यांची लष्कर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 23 जून 2024 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. त्यांना पुढील तीन वर्षांसाठी लष्करप्रमुख बनवण्यात आले आहे. याआधी ते चीफ ऑफ जनरल स्टाफ होते.
1985 मध्ये त्यांची इन्फंट्री कॉर्प्स ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. वकार यांनीअनेक पदांवर काम केले आहे. याआधी त्यांनी इन्फंट्री बटालियन आणि इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्वही केले आहे.
बांग्लादेशातील शेरपूर जिल्ह्यात जन्मलेले जनरल वकार उझ जमान यांनी डिफेन्स सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर डिफेन्स स्टडीजमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. तसेच त्यांनी लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून संरक्षण अभ्यासात 'एम'एची पदवीही घेतली आहे.
मिडियाच्या रिपोर्टनुसार, जनरल वकार उझ जमान यांच्या पत्नीचे नाव बेगम सरहनाज कमलिका रहमान असून त्या बांग्लादेशचे माजी लष्करप्रमुख जनरल मुस्तफिजुर रहमान यांच्या त्या कन्या आहेत. जनरल मुस्तफिजुर रहमान हे शेख हसीनाचे काका आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.