'सकाळ माध्यम समुहाचे'व्यवस्थापकीय संचालक आणि 'एपी ग्लोबाले'चे संस्थापक अध्यक्ष अभिजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. विविध विषयांवर पंतप्रधान मोदी यांनी मनमोकळा संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) झालेल्या या चर्चेतला वेचक भाग
A:सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे देशातील लोकशाही मजबूत झाली आहे.विरोधकांनी ईव्हीएमबाबत निराधार आरोप करत या लोकशाही व्यवस्थेलाच नख लावण्याचा प्रयत्न केला होता. सर्वोच्च न्यायालयाने हे सगळे आरोप बाजूला ठेवले आहेत.आरोप करणाऱ्या विरोधकांना चांगलेच ठाऊक आहे, की या देशातील जनता त्यांना नाकारणार आहे त्यामुळेच त्यांनी ईव्हीएमबाबत चुकीची माहिती पसरविण्यास सुरुवात केली होती. पुन्हा मतपत्रिकांवर मतदान घेण्याची मागणी ते करू लागले होते.
विरोधकांचे हे चुकीचे आरोप भविष्यात देखील थांबणारे नाहीत. शेवटी त्यांना मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करायचा असून त्यांचे खच्चीकरण करायचे आहे. पूर्वी हीच इंडिया आघाडीची मंडळी मतदान केंद्रेच ताब्यात घेत असत. मतपेट्यादेखील पळविल्या जात होत्या. यामाध्यमातून एससी, एसटी, ओबीसी आणि महिलांचा आवाज दाबला जात असे.
आता हे करणे शक्य नसल्याने त्यांची तगमग होते आहे. आपल्याला आणखी एक चिंताजनक ट्रेंड सध्या पाहायला मिळतो आहे. विरोधी पक्ष कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून माझे आणि आमच्या पक्षातील इतरांचे फेक व्हिडिओ तयार करत आहेत. योग्य मार्गाने आमच्याविरोधात संघर्ष करून विजयी होण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे राहिलेले नाही, त्यामुळेच ते अशा प्रकारच्या लाजिरवाण्या गोष्टी करत आहेत.
A:ही अत्यंत धोकादायक योजना असून देशाच्या विकासाची गाडी मार्गावरून घसरविण्याची यात क्षमता आहे. विरोधाभास म्हणजे, जो पक्षच वारसाहक्क असल्यासारखा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीच्या हातात आला आहे, त्यांनाच सामान्य नागरिकांनी कष्टाने मिळविलेला पैसा आणि संपत्ती काढून घ्यायची आहे.
वारसा हक्क आणि संपत्तीचे फेरवाटप यांच्याकडे एकत्रितपणे पाहिल्यास, त्यांना काय करायचे आहे, हे सहज लक्षात येते. गरिबांनी आणि मध्यमवर्गीयांनी बचत केलेल्या पैशांवर ते डल्ला मारतील. ते शेतकऱ्यांची जमीन हिरावून घेतील.
आमच्या माता-भगिनींचे दागिने ते हिसकावून घेतील. तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी साठविलेल्या पैशांवर डल्ला मारतील. तुम्ही तुमच्या मुलांसाठी बनविलेले छोटेसे घरही ते हिसकावून घेतील. निवडक अल्पसंख्याकांसाठीच असलेल्या त्यांच्या फेरवाटप योजनेसाठी पैसा उभा करण्यासाठी हे सर्व हिसकावून घेतले जाईल. देशातील साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे, हे मनमोहनसिंग यांच्यापासून इतरांपर्यंत, अनेकांनी वारंवार सांगितले आहे. म्हणजेच, सामान्य जनतेकडून हिसकावून घेतलेली संपत्ती यांच्या मतपेढीकडे जाणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.