PM Modi News: ‘मोदी घर में घुसकर मारता है’

Lok Sabha election 2024: दहशतवादाविरोधातील कायद्यांना मजबूत करून आणि विविध केंद्रीय संस्था आणि राज्यांच्या दलांमधील समन्वय वाढवून आम्ही दहशतवादाबाबत ‘झीरो टॉलरन्स’ धोरण राबविले.
Lok Sabha election 2024
Lok Sabha election 2024Sarkarnama
Published on
Updated on

'सकाळ माध्यम समुहाचे'व्यवस्थापकीय संचालक आणि 'एपी ग्लोबाले'चे संस्थापक अध्यक्ष अभिजित पवार यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. विविध विषयांवर पंतप्रधान मोदी यांनी मनमोकळा संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) झालेल्या या चर्चेतला वेचक भाग

Q: हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे आणि याचा महाराष्ट्रातील आणि भारतातील जनतेवर दूरगामी परिणाम झालेला आहे - दहशतवाद. भाजप सत्तेत आल्यापासून दहशतवादी हल्ल्यांच्या संख्येत प्रचंड घट झाली असून आता तर त्याचा मागमूसही नाही. याचे श्रेय तुम्ही कशाला देता?

A: २०१४ मध्ये जेव्हा सर्वप्रथम निवडणूक लढविली, तेव्हा देशात भयाचे वातावरण होते. देशातील प्रत्येक मोठ्या शहरांवर दहशतवादाचे ओरखडे होते. ते शहर मग गुवाहाटी असो, दिल्ली असो की जयपूर, मुंबई आणि पुणे असो.

मुंबईसारख्या शहरावर अनेकदा अशा हल्ल्यांनी जखमा केल्या आहेत. २००६ मध्ये रेल्वेतील बाँबस्फोट, २६/११ चा हल्ला किंवा ओपेरा हाउसमधील स्फोट (२०११). प्रत्येक वेळी हल्ले झाले आणि लोक असहाय होत होते. पुण्यातही जर्मन बेकरीत बाँबस्फोट झाल्याचे आपण पाहिले.

तरीही कोणतीही कारवाई झाली नाही. या दहशतवादी हल्ल्यांच्या पूर्वीही आणि नंतरही ‘यूपीए’ सरकारने दाखविलेल्या उदासीनता आणि असंवेदनशीलतेमुळे प्रत्येक भारतीयाच्या मनावर चरे पडले. एका बाजूला, देशाला दहशतवादाचा उबग आला होता आणि दुसऱ्या हाताला देशाचे नेते मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांबद्दल अश्रू ढाळत होते.

आम्ही हा दृष्टिकोन बदलला. आता देशासमोरील कोणत्याही दहशतवादी आव्हानाचा सामना करण्यासाठी सुरक्षा संस्थांना पूर्ण अधिकार आणि मोकळीक देण्यात आली आहे. दहशतवादाविरोधातील कायद्यांना मजबूत करून आणि विविध केंद्रीय संस्था आणि राज्यांच्या दलांमधील समन्वय वाढवून आम्ही दहशतवादाबाबत ‘झीरो टॉलरन्स’ धोरण राबविले.

सर्जिकल स्ट्राइक आणि हवाई हल्ले करत आम्ही एक ठाम संदेश दिला की दहशतवादाला पाठबळ देणाऱ्यांनी भारतावर हल्ले करण्याआधी दोन वेळेस विचार करावा. आज आपल्या शत्रूला समजून चुकले आहे की ‘मोदी घर में घुसकर मारता है’. ‘सुरक्षित भारत’ असला तरच ‘विकसित भारत’ घडविता येतो.

Lok Sabha election 2024
PM Modi News: महाराष्ट्रातली आमची प्रगती उत्तमच; आता राज्याला आणखी पुढे नेण्याची माझी 'गॅरंटी'

Q: सध्या देशभर उन्हाचा कडाका वाढल्याने अंगाची लाही लाही होते आहे. प्रत्येक जण थकून जातो. अशा प्रतिकूल स्थितीत देखील तुम्ही स्वतःमधील ऊर्जा कशी टिकवून ठेवता? सध्या देशभर तुमच्या सभांचा धडाका सुरू असून न थकता तुम्ही रोड शोमध्येही सहभागी होत आहात. एका दिवसामध्ये तीन ते चार सभा घेता. काहीजण एका सभेनंतरच थकून जातात. तुमच्या या शक्तीमागे रहस्य काय आहे?

A- ही ऊर्जा किंवा शक्ती माझ्या कोणत्या प्रयत्नांमुळे किंवा यशामुळे आली आहे, असे मला वाटत नाही. मी ज्यावेळी माझ्या झालेल्या सभांची आणि रोड शोची संख्या पाहतो, त्या वेळी हा सर्व देवाचा आशीर्वाद आहे, अशीच माझी भावना असते.

दिवसाच्या कोणत्याही वेळी, मी अनेक कामे एकाच वेळी करत असतो. मी एका जागेवरून दुसऱ्या जागीही जात असतो. दैवी आशीर्वाद आणि शक्तीच्या मदतीनेच हे सर्व शक्य झाले आहे. मला अशा प्रकारची शक्ती प्रदान केल्याबद्दल आणि लोकांची सेवा करण्याचे साधन बनविल्याबद्दल मी देवाचा आभारी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com