Hemant Soren Sarkarnama
देश

Hemant Soren News : ...तर राजकारण सोडेन! जेलमधून थेट विधानसभेत जात सोरेन यांचं ईडीला चॅलेंज

Rajanand More

Jharkhand : कथित भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीने अटक केलेल्या हेमंत सोरेन यांनी आज झारखंडच्या विधानसभेत हजेरी लावली आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर चंपई सोरेन नवे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्या सरकारला आज बहुमत चाचणी परीक्षेला सामोरे जावे लागते आहे. त्यामध्ये मतदान करण्याची परवानगी विशेष न्यायालयाने हेमंत सोरेन यांना दिली आहे. ही संधी साधत सोरेन यांनी विधानसभेत येऊन ईडीला चॅलेंज दिलं आहे. (Hemant Soren News )

ईडीने (ED) मागील आठवड्यात हेमंत सोरेन यांना अटक केली आहे. सध्या ते ईडीच्या कोठडीत आहे. अटकेपुर्वी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान होणार आहे. न्यायालयाने दिलेल्या परवानगीनुसार हेमंत सोरेन विधानसभेत हजर झाले आहेत.

विशेष अधिवेशन सुरू झाल्यानंतर राज्यपालांचे अभिभाषण झाले. त्यानंतर मुख्यमंत्री चंपई सोरेन (Champai Soren) यांनीही भाषण केले. अटकेनंतर विधानसभेत (Assembly) आलेल्या सोरेन यांनीही भाषण करत थेट ईडीला चॅलेंज केलं. ते म्हणाले, मला करण्यात आलेली अटक ही भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस होता. भूखंड घोटाळ्याशी आपल्या संबंध असल्याचे ईडीने सिध्द करावे, असे चॅलेंजही त्यांनी दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मला साडे आठ एकर जमीन घोटाळाप्रकरणात मला अटक करण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये हिंमत असले तर त्यांनी पुरावे दाखवावेत. जमीन माझ्या नावावर नोंदणीकृत असल्याची कागदपत्रे दाखवावीत. हे जर सिध्द झाले तर मी राजकारण सोडेन, असे आव्हान सोरेन यांनी दिले.

सोरेन यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. माझ्या अटकेमध्ये राज्यपालांचाही सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 31 जानवारीच्या रात्री देशात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आले. या घटनेत राज भवनचाही सहभाग असल्याची मला खात्री असल्याचे सोरेन म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT