Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या तोंडावर ममतांना धक्का? खासदाराचा सरकारी समित्यांचा राजीनामा

TMC MP Dipak Adhikary : अभिनेते व खासदार दिपक अधिकारी यांनी तीन सरकारी समित्यांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे बंगालच्या राजकारणात चर्चेला उधाण.
TMC MP Dipak Adhikary, Mamata Banerjee
TMC MP Dipak Adhikary, Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

West Bengal : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांमध्ये नेत्यांची धाकधूक वाढू लागली आहे. काही पक्षांमध्ये उलथापालथ सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या काँग्रेसच्या एका खासदाराने तीन सरकारी समित्यांचा अचानक राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे तृणमूलच्या सर्वेसर्वा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसणार, अशी जोरदार चर्चा आता रंगली आहे. (Lok Sabha Election 2024)

खासदार दिपक अधिकारी (TMC MP Dipak Adhikary) यांनी राज्यातील तीन सरकारी समित्यांचा राजीनामा दिला आहे. या तिन्ही समित्या त्यांच्या मतदारसंघातील आहेत. अधिकारी हे घटाल मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी कोणतेही कारण न देता राजीनामा दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकारी हे बंगालमधील प्रसिध्द अभिनेतेही आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी तृणमूलमध्ये (TMC) प्रवेश केला होता.

TMC MP Dipak Adhikary, Mamata Banerjee
Champai Soren Floor Test : चंपई सोरेन सरकारची आज अग्निपरीक्षा, अटकेत असलेले हेमंत सोरेन राहणार उपस्थित...

घटाल सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल रुग्ण कल्याण समिती, बिरसिंघा उन्नयन परिषद आणि घटाल रविंद्र सेंटेनरी कॉलेज नियामक मंडळ या तिन्ही सरकारी संस्थांमधील समित्या आहेत. अधिकारी यांनी शनिवारीच ही पदे सोडली आहेत. याबाबत त्यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. चित्रपटसृष्टीत त्यांना देव म्हणून ओळखले जाते. लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी हा राजीनामा दिल्याने ममतांना (Mamata Banerjee) धक्का मानला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, तृणमूलचे ज्येष्ठ नेते व मंत्री फरहाद हकीम यांनी सांगितले की, 'देव हे पक्षातच आहेत. तसेच पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार ते आगामी लोकसभा निवडणुकीत काम करतील.' तृणमूल युवकचे प्रदेशाध्यक्ष सयानी घोष म्हणाले की, देव हे मैदान सोडून पळून जाणाऱ्यामधील नाहीत. निवडणुकीत लढवताना समित्यांसी संबंधित आर्थिक बाबींशी काही संबंध असू नये, म्हणून त्यांनी राजीनामा दिला आहे.

देव यांच्या राजीनाम्यावर भाजपने ममतांवर निशाणा साधला. प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजुमदार म्हणाले, 'टीएमसीसारख्या भ्रष्टाचारी पोसणाऱ्या पक्षापासून देव हे लांब राहण्याचा प्रयत्न करत आहेत. देव हे चांगले व्यक्ती असून टीएमपीसारखा त्यांच्यासाठी योग्य नाही. या पक्षापासून दूर जाण्यासाठीचे हे त्यांचे पहिले पाऊल आहे.' मुजुमदार यांच्या या सुचक वक्तव्यामुळे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

TMC MP Dipak Adhikary, Mamata Banerjee
Arvind Kejriwal News : भाजपकडून ऑफर, पक्षात आल्यास सोडून देऊ! केजरीवालांनी फोडला बॉम्ब

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com