Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal : केजरीवालांना दिल्ली हायकोर्टाकडून झटका; ‘तो’ खटला सुरूच राहणार

ED Case Delhi Liqour Policy Scam Excise Scam Delhi High Court : कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणातील खटल्याला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका अरविंद केजरीवालांना दाखल केली होती.

Rajanand More

New Delhi : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना गुरूवारी मोठा धक्का बसला. कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी ईडीने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे केजरीवालांवरील खटल्याचे कामकाज सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी केजरीवालांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच ते जेलमधून बाहेर आले आहेत. दिल्लीत जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे. त्याआधी खटल्यातून दिलासा मिळवण्यासाठी केजरीवालांनी या खटल्याला स्थगिती द्यावी, या मागणीची याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल केली होती.

कोर्टाने खटल्याच्या सुनावणीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच केजरीवालांच्या याचिकेवर आपली बाजू मांडंण्यासाठी ईडीला नोटीस बजावली आहे. दरम्यान, केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने ईडी केसमध्ये 12 जुलैला जामीन मंजूर केला होता. तसेच सीबीआय केसमध्येही त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीसह सीबीआयनेही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात केजरीवालांसह माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनाही अटक करण्यात आले होते. तिघेही सध्या जामीनावर बाहेर आहेत. कथित घोटाळ्यात मिळालेले कोट्यवधी रुपये गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत वापरल्याचा आरोप ईडीने केला आहे.

दिल्लीत जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी केजरीवालांकडून दिल्लीत पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्नांच पराकाष्ठा केली जात आहे. आजच 11 उमेदवारांची पहिली उमेदवारी यादी जाहीरही करण्यात आली आहे. निवडणुकीआधी आपली प्रतिमा सुधारण्यासाठी त्यांच्याकडून खटल्याला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT