Delhi News: उद्योगपती आणि अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांना अमेरिकेते मोठा झटका बसला आहे. त्यांच्यावर फसवणूक आणि लाचप्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर राहुल यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांनी अदानींना आजच अटक करण्याची मोठी मागणी केली आहे. चौकशीमध्ये मोदींचेही नाव समोर येईल, असा मोठा दावाही त्यांनी केला आहे.
अदानी यांच्या एका कंपनीवर अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक करणे आणि एक कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांची लाच दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण अदानी ग्रीन एनर्जी आणि इतर कंपन्यांशी संबंधित असल्याचे समजते. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, अदानी ग्रुपच्या कंपन्यांनी 600 मिलियन डॉलरचे बॉन्ड रद्द केले आहेत.
या घटनेवरून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. गेल्या तीन दिवसांत अदानी समूहाला 66 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 5.38 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याचा थेट परिणाम गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीवर झाला आहे. तर पाहूयात अदानीचा कोणत्या कोणत्या क्षेत्रात व्यवसाय पसरला आहे.
गौतम अदानी यांनी 1988 मध्ये अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडची स्थापना करून व्यवसाय सुरु केला. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड वस्तू आणि धातू, कृषी उत्पादने आणि कापड यांसारख्या उत्पादनांचे बिझनेस करते.
1995 मध्ये गौतम अदानी यांनी पोर्ट व्यवसायात प्रवेश केला. सध्या, अदानी यांची भारतातील समुद्रालगत असणाऱ्या 7 राज्यांमध्ये 13 पोर्ट आहेत. अदानी समूहाचे मुंद्रा बंदर आज भारतातील सर्वात मोठे खाजगी बंदर आहे. गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी हे पोर्ट्स अँड सेझ लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत.
अदानी पॉवरची सुरुवात 22 ऑगस्ट 1996 रोजी झाली. अदानी पॉवर लिमिटेड विद्युत उर्जेच्या उत्पादनाशी संबंधित प्रकल्प राबवते. त्याचे मुख्यालय अहमदाबाद येथे आहे. कंपनीने देशातील गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि चंदीगड या सहा राज्यांमध्ये 12,410 मेगा वॅट क्षमतेची औष्णिक वीज प्रकल्प बसवले आहेत. अदानी पॉवर ही देशातील सर्वात मोठी खाजगी औष्णिक वीज उत्पादक कंपनी आहे.
अदानी समूहाने जानेवारी 1999 मध्ये विल ॲग्री बिझनेस ग्रुप विल्मारच्या सहकार्याने खाद्यतेल व्यवसायात प्रवेश केला. आज देशात सर्वाधिक विकले जाणारे फॉर्च्युन ऑइल अदानी-विल्मर कंपनीद्वारे उत्पादित केले जाते. तेल व्यतिरिक्त, अदानी विल्मर दैनंदिन लागणाऱ्या जवळपास प्रत्येक वस्तूचे उत्पादन करते. अदानी विल्मरचे शेअर्स गगनाला भिडले असतात. पण अमेरिकेत झालेल्या घटनेमुळे त्यांचीही अवस्था बिकट आहे.
अदानी टोटल गॅस वाहनांसाठी सीएनजी आणि घरे आणि कारखान्यांसाठी पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) रिटेल करते. अदानी टोटल गॅसची गॅस मीटर निर्मिती कंपनी स्मार्ट मीटर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (एसएमटीपीएल) मध्ये 50 टक्के भागीदारी आहे. अदानी टोटल गॅसचे वितरण नेटवर्क गुजरातमधील वडोदरा आणि अहमदाबाद, हरियाणातील फरिदाबाद आणि उत्तर प्रदेशातील खुर्जामध्ये आहे. याशिवाय अलाहाबाद, चंदीगड, एर्नाकुलम, पानिपत, दमण, धारवाड आणि उधम सिंग नगरमध्ये गॅस वितरणाचे काम अदानी टोटल गॅस लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडे आहे.
अदानी ग्रीन एनर्जी ही देशातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी आहे. अदानी ग्रीन एनर्जी ही समूहाची अक्षय ऊर्जा शाखा आहे. ज्याच्या पोर्टफोलिओमध्ये पवन आणि सौर ऊर्जा प्रकल्प आहेत. अदानी ग्रीन एनर्जीला 2025 पर्यंत 25 गिगा वॅट्सची क्षमता पूर्ण करायची आहे.
अदानी ट्रान्समिशन लिमिटेड (ATL) ही भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज वितरण कंपनी आहे. त्याची स्थापना 2006 मध्ये झाली. अहमदाबाद, गुजरात येथे मुख्यालय असलेली अदानी ट्रान्समिशन लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील वीज कंपन्यांपैकी एक आहे. त्याची उपस्थिती भारतातील सर्व प्रदेशात आहे.
अदानी समूहाने 2019 मध्ये विमानतळ क्षेत्रात प्रवेश केला. गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी हे काम पाहतो. ते या कंपनीचे संचालक आहेत. अहमदाबाद, लखनौ, मंगळुरु, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम या सहा विमानतळांचे आधुनिकीकरण आणि ऑपरेशनसाठी अदानी समूह जबाबदार आहे.
2022 मध्ये, अदानी समूहाने अंबुजा सिमेंटमधील 63.15 टक्के आणि ACC मधील 56.69 टक्के भागभांडवल खरेदी केले होते. अंबुजा सिमेंट आणि ACC लिमिटेड यांची एकत्रित क्षमता वार्षिक ६६ दशलक्ष टन आहे. या करारानंतर, अदानी भारतातील सिमेंट क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी बनली. अंबुजा सिमेंटचे देशात 6 सिमेंट प्लांट आहेत, तर 8 सिमेंट ग्राइंडिंग युनिट्स आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.