Delhi Elections News: दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला बहुमत मिळत असल्याचे एक्झिट पोल आहेत. मात्र, एक दोन नव्हे तर तब्बल 20 जागांवर काहीही निकाल लागू शकतो, असे एक्झिट पोल करणारेच सांगत आहेत.
एक्झिट पोल करणाऱ्या एजन्सींकडून सांगण्यात येत आहे की, काही मतदारांमुळे ते संभ्रमात पडले आहेत. जे मतदानाच्या आधी मतदान करण्याचा मुद्दा वेगळा सांगितला होता आणि मतदान करून आल्यानंतर मतदानाचा मुद्दा वेगळा सांगितला. काही मतदार तर फोनही उचलत नाहीत.
मतदारांप्रमाणे आप आणि भाजपच्या उमेदवारांची अवस्था कमी अधिक प्रमाणात आहे. 'आप'मधील सुत्रांनी एका हिंदी न्यूज चॅनेलला दिलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांनी स्वतः काल रात्री उशिरापर्यंत फोनवर 'आप'च्या उमेदवारांशी बोलून मतदानाचा पॅटर्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण, उमेदवारही गोंधळलेले दिसत होते. आपच्या उमेदवारांप्रमाणे भाजप नेत्यांचीही तीच अवस्था होती. दोन्ही पक्षांना किमान 20 विधानसभा मतदारसंघात काय होणाय याची अंदाज बांधता येत नाहीये.
एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत दाखवत असले तरी सट्टा बाजारात आपला 38 ते 40 जागा तर भाजपला 30 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. सट्टा बाजार ने कांग्रेसला एकही जागा मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली विधानसभेचा बहुमतचा आकडा 36 आहे. मागील दोनही विधानसभा निवडणुकीत आपने एकतर्फी विजय मिळवला होता.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत कोणाची सत्ता येणार याचा अंदाज 20 मतदारसंघात येत नाही. या मतदारसंघातमध्ये नई दिल्ली, जंगपुरा, कालकाजी, लक्ष्मी नगर, पटपडगंज, नरेला, बराड़ी, किराड़ी, सुल्तानपुर माजरा, शालीमार बाग, चांदनी चौक, करोलबाग, रजौरी गार्डन, तिलक नगर, बिजवासन, आरके पुरम, आंबेडकर नगर, संगम विहार, तुगलकाबाद, बदरपुर, त्रिकोलपुरी, कोंडली या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघामध्ये दोन्ही पक्षाती विजय आणि पराजचे अंतर 1500 से 5000 मतांचे असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.