Bharat Sarkarnama
देश

India Or Bharat : अबब! 'इंडिया'चा भारत करण्यासाठी होणाऱ्या खर्चाचा आकडा पाहून डोळे होणार पांढरे

Expense for Exclude India Name : चलनी नोटांपासून ते आर्थिक संस्था, सरकारी संस्थांची नावे बदलावी लागणार

उत्तम कुटे

Delhi News : आपल्या देशाचे नाव इंग्रजीत 'इंडिया' तर मराठी, हिंदीत भारत असे वापरले जाते. आता, मात्र फक्त भारत असे नाव करण्यासाठी संविधानात बदल केला जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हे नाव बदलण्यासाठी मोठा खर्च होणार आहे. देशाचे नाव फक्त भारत ठेवून आणि इंडिया काढण्यासाठी तब्बल १४ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. (Latest Political News)

केंद्र सरकारने १८ सप्टेंबरपासून पाच दिवशीय विशेष अधिवेशन बोलावले आहे. संसदेच्या या खास अधिवेशनात एक देश, एक निवडणूक या मुख्य विषयासह इंडियाचे भारत नामांतर करण्यावरही चर्चा केली जाणार असल्याचे समजते. आतापर्यंत रस्ते आणि काही शहरांची नावे बदलण्यात येत होती. त्यातही देशात उत्तर प्रदेश या राज्यात नामांतराचे मोठे फॅड सुरु आहे. अशी सर्वाधिक नामांतरे तेथेच झाली आहेत. मात्र, आता थेट देशाचेच नाव बदलण्याचा घाट घालण्यात आला आहे.

इंडियाचे भारत करण्यासाठी सर्व सरकारी दस्तावेजांमध्ये देशभरामध्ये बदल करण्यासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च येईल, असा अंदाज आहे. कारण एका शहराचे नाव बदलण्यासाठी अंदाजे २०० ते ५०० कोटी रुपयांचा खर्च येतो. एखाद्या राज्याचे नाव बदलायचे झाले, तर हा आकडा पाचशे कोटींच्या घरात जातो. (Maharashtra Political News)

भारतासारख्या खंडप्राय देशाचे नाव बदलण्याचा खर्च १४ हजार रुपये अपेक्षित आहे. कारण देशाचे नाव बदलते तेव्हा तेथील रहिवाशांचे पत्ते, कागदोपत्रातील उल्लेख बदलावे लागतात. चलनी नोटांपासून ते आर्थिक संस्थांबरोबरच सरकारी संस्थांची नावे बदलावी लागतात. बऱ्याच ठिकाणी कागदोपत्री बदल असल्याने त्यात वेळेबरोबर पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च होतो.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT