Manoj Jarange Live : ट्रकभर पुरावे देण्यास तयार, पण मुदतवाढ मागू नका; मनोज जरांगेंनी सरकारला ठणकावलं

Maratha Reservation And Maharashtra Government : कायद्याच्या स्तरावर आरक्षण टिकवण्यासाठी तज्ज्ञ देण्यास तयार
Manoj Jarange
Manoj Jarange Sarkarnama

Jalna Political News : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला वेळ देऊन यापूर्वीही संधी दिली. आता आवश्यक ती आणि लागतील तेवढे पुरावे देण्यास तयार आहोत. यामुळे कागदपत्रे जमा करण्याचा सरकारचा वेळ वाचणार आहे. तसेच आम्ही दिलेल्या कागदपत्रांच्या जोरावर सरकार एका दिवसात अद्यादेश काढू शकते. त्यामुळे सरकारने आता चार दिवस, एक महिना असा वेळ वाढवून मागण्याची गरज नाही. यामुळे आम्ही देणार असलेली कागदपत्रे सरकारने स्वीकारावे, असे आवाहन करून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे. (Latest Political News)

Manoj Jarange
Cabinet On Maratha Reservation : मराठा आंदोलक अन् शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

सरकारतर्फे आलेल्या शिष्टमंडळाने पुरावे जमा करून अद्यादेश काढण्यासाठी महिन्याभराची मुदतवाढ मागितली होती. यावर जरांगे यांनी चार दिवासांचा अल्टिमेटम दिला होता. आता प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगेंनी सरकारला हवे तेवढे आणि आवश्यक ते सर्व पुरावे देण्यास तयार आहे. त्यासाठी भेटायला यावे, असे आवाहन करून पुरावे घेतल्यानंतर एका दिवसातच राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा आदेश काढावा, असा इशारा जरांगेंनी दिला आहे. (Maharashtra Political News)

'मराठा आरक्षणासाठी सरकार मागेल तितके पुरावे आम्ही देऊ. यामुळे सरकारचा जनतेसाठी काम करण्यासाठी लागणारा अमूल्य वेळ वाचेल. तसेच आरक्षण कायद्याच्या पातळीवर टिकण्यासाठी घटनातज्ज्ञही देऊ. आता सरकारने वेळ वाया घालवू नये. पुरावे स्वीकारून एका दिवसात आरक्षणाचा आदेश काढावा', असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला केले आहे.

Manoj Jarange
Pankaja Munde Shivshakti Rally : पंकजा मुंडे यांचे शंभू महादेवाच्या चरणी साकडे; म्हणाल्या, मुंडे साहेबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला शक्ती दे....

'सरकारची इच्छाशक्ती असेल तर एका दिवसात अध्यादेश निघेल. तेवढे पुरावे आहेत. यामुळे पुरावे जमा करण्याचा सरकारचा वेळ वाचणार आहे. ते जे पुरावे, कागदपत्रे जमा करणार तीच माझ्याकडे आहेत', असे म्हणत 'हे पुरावे स्वीकारण्यासाठी सराकरने आजच यावे', असे जरांगे म्हणाले. तसेच यापूर्वीही समितीला खूप वेळ घेतला आहे. त्यामुळे या समितीला पुरावे देणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Manoj Jarange)

जरांगे पाटील म्हणाले, 'हैदराबाद संस्थानपासूनचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. या कागदपत्रांद्वारे मराठा समाज कुणबी असल्याचे स्पष्ट होते. सरकारला या कागदपत्रांच्या आधारे एका दिवसात अध्यादेश काढता येईल. या पुराव्यांच्या आधारे काढलेला अध्यादेश कायद्याच्या पातळीवरही टिकेल. आता सरकारने निर्णय घ्यावा, आम्ही सहकार्य करायला तयार आहोत', असेही जरांगेंनी सांगितले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com