Delhi Mayor Election: दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने भाजपचा दारुण पराभव केला आहे. आम आदमी पक्षाने १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा पराभव करत दिल्ली महापालिका ताब्यात घेतली. आपने १३४ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला १०४ जागांवर समाधान मानावे लागले आहे, आता महौपार कोण होणार, याबाबत चर्चा सुरु आहे.
दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आपला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी, "महापौर आमचाच होणार" असे भाजपचे नेते सांगत आहेत. सर्वात जास्त जागा मिळवल्यानंतरही आप ला महापौरपद का मिळणार नाही, भाजपचा दावा खरा ठरणार का, याबाबत जाणून घेऊनया
यापूर्वी चंदीगडमध्येही आपला सर्वाधिक जागा मिळाल्या असताना भाजपाचा महापौर निवडून आला होता. त्यामुळे दिल्ली महापालिकेत महापौरपद निवडीची समीकरणं वेगळी असतात, हे समजून घेतलं पाहिजे.
आपच्या महापौरपदासाठीच्या दाव्याला अन्य पक्षाने विरोध केला तर निवडणुक घेतली जाईल. त्यानंतर अर्थातच जास्त नगरसेवक असलेल्या आपचा महापौर होईल, अशी शक्यता आहे. पण या नगरसेवकासोबत अन्य काही लोकप्रतिनिधीही या निवडणुकीत मतदान करतात, त्यामुळे महापौर निवडीची समीकरणं वेगळी असतात.
महापालिका निवडणुकीत पक्षांतर विरोधी कायदा लागू होत नाही. कोणताही पक्ष आपल्या नगरसेवकांसाठी व्हीप जारी करू शकत नाही. त्यामुळे महापौरपदासाठी ‘क्रॉस-वोटिंग’ होण्याची शक्यता असते.
नगरसेवकांबरोबच दिल्लीतील आमदार, खासदारही मतदान करतात.
यानिवडणुकीत नामनिर्देशित सदस्य मतदान करत नाहीत.
दोन्ही उमेदवारांना सारखी मतं मिळाल्यास सोडचिठ्ठीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येते.
भाजपाचे लोकसभेत सात खासदार आहेत. ‘आप’चे राज्यसभेत तीन खासदार आहेत.
भाजपाचे सात खासदार आणि निवडून आलेले नगरसेवक मिळून त्यांची संख्या १११ पर्यंत पोहोचते.
‘आप’कडे तीन खासदार, निवडून आलेले नगरसेवक आणि १४ आमदार मिळून ही संख्या १५१ पर्यंत पोहोचते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.