Chandrakant Patil News
Chandrakant Patil News Sarkarnama

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांवर शाईफेक ; ११ पोलिसांवर मोठी कारवाई

Chandrakant Patil : कार्यक्रमस्थळी पोलिस बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात आठ पोलीस व तीन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Chandrakant Patil : पिंपरी-चिंचवडमध्ये मोरया गोसावी महोत्सवासाठी भाजप नेते, आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे काल (शनिवारी) आले होते. तेव्हा त्यांच्यावर शाईफेक हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणात मोठी अपडेट येत आहेत.

याप्रकरणी पिंपरी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांना अटकही करण्यात आली आहे. मुख्य आरोपी मनोज घरबडे यानं दोन साथीदारांसह शाईफेक केली असल्याचे पोलिससुत्रांनी सांगितले. याप्रकरणी सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chandrakant Patil News
MNS : मी मनसे सोडावी, असं पक्षातील काहींना वाटतयं..; मोरें म्हणाले, मी राज साहेबांना स्पष्ट सांगितलं..

चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमस्थळी पोलिस बंदोबस्तासाठी असलेल्या अकरा पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात आठ पोलीस व तीन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांमध्ये मनोज घरबडे, विजय ओव्हाळ आणि धनंजय ईचगज यांचा सहभाग होता. पोलिस त्यांची चौकशी करीत आहेत. एका पत्रकारालाही अटक केली असल्याची माहिती आहे.

महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर काल (शनिवारी) पिंपरीमध्ये शाईफेक करण्यात आली. "महाराष्ट्रात झुंडशाही सुरु असून, हिंमत असेल तर समोर या," असं आव्हान काल (शनिवारी) चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना दिलं आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील..

"महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरु केल्या," असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी चंद्रकात पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चंद्रकात पाटलांच्या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com