Wrestlers Protest At Jantar Mantar:  Sarkarnama
देश

Wrestlers Protest At Jantar Mantar: जंतरमंतरवर मोठा गोंधळ; बॅरिकेड्स तोडून शेतकऱ्यांचं कुस्तीपटूंच्या आंदोलनाला समर्थन, पाहा व्हिडीओ

Kisan Morcha At Jantar Mantar | किसान मोर्च्याचे अध्यक्ष राकेश टिकैत यांनीही ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले

सरकारनामा ब्युरो

Wrestlers Protest At Jantar Mantar : दिल्लीतील जंतरमंतर मैदानात सुरु असलेल्या कुस्तीपटूंचे आंदोलन आक्रमक वळणावर पोहचले आहे. भाजप नेते आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करत खेळाडूंनी अटकेची मागणी कुस्तीपटूंनी केली आहे. या आंदोलनात आता शेतकऱ्यांनीही उडी घेतली आहे. (Farmers broke the barricades and participated in the wrestlers protest)

कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आता शेतकरीही जंतरमंतर कडे निघाले होते. पण शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. हे बॅरिकेड्स हटवून आता शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी पोहचले. शेतकरी नेते राकेश टिकैत हेदेखील याठिकाणी उपस्थित होते. यावेळी मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. (Janatar mantar Protest)

जंतरमंतर मैदानाकडे निघालेल्या किसान मोर्चातील सिद्धू नावाच्या आंदोलकाने सांगितले की, बॅरिकेड्स तोडूनच पुढे जाऊ या विचाराने आलो होतो. त्यामुळे आम्ही बॅरिकेडिंग तोडले. हे शेतकरी जम्मू तावी ट्रेनने आले आहेत. हे ट्रॅक्टर ट्रॉलीतून येतील, असे पोलिसांना वाटल्याने सीमेवर बंदोबस्त वाढवण्यात आला होता. जंतरमंतरवर हे शेतकरी झेंडा फडकवत, बॅरिकेडिंग तोडत पुढे सरसावले. यादरम्यान सीआरपीएफ आणि दिल्ली पोलीस आमच्यावर धाऊन आले, पण नंतर ते बाजूला झाले. (National News)

किसान मोर्च्याचे अध्यक्ष राकेश टिकैत यांनीही ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले. जंतर-मंतरवर कुस्तीपटूंना भेटायला आलेल्या राकेश टिकैत यांनी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाहन केलं आहे. या खेळाडूंनी देशाची प्रतिष्ठा वाढवली आहे. ब्रिजभूषण यांना जर अटक झाली नसेल तर त्यांना अटक करा. आपण कुस्तीपटूंच्या पाठीशी आहोत. आंदोलनासाठी बैठक सुरू आहे. आम्ही चर्चा करून पुढील रणनीती ठरवू. असंही त्यांनी म्हटलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT