PM Modi And Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi: "एकदाचं 'दुध का दूध, पानी का पानी' करुन टाका! माझ्यावर अवमानयाचिका दाखल कराच"; राहुल गांधींचं PM मोदींना पुन्हा खुलं आव्हान

Rahul Gandhi: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात काँग्रेसनं दिल्लीच्या रामलीला मैदानावर काढलेल्या विराट मोर्चानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर टीका केली होती.

Amit Ujagare

Rahul Gandhi: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात काँग्रेसनं दिल्लीच्या रामलीला मैदानावर काढलेल्या विराट मोर्चानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर टीका केली होती. काँग्रेसला परदेशातून फंडिंग येत असून त्याचा उपयोग देशात अराजकता माजवण्यासाठी केली जात असल्याचं मोदींनी म्हटलं होतं. पण आता राहुल गांधी यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. तुम्हीच परदेशातील फंडिंगद्वारे पंतप्रधान झाला आहात, अशा तिखट शब्दांत राहुल गांधींनी त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर त्यांनी आता तुम्ही माझ्यावर अवमानकारक याचिका दाखल कराच आणि एकादाचं दूध का दूध पानी का पानी करुनच टाका अशा शब्दांत नव्यानं आव्हान दिलं आहे.

राहुल गांधी यांनी एका व्हिडिओद्वारे पंतप्रधानांना आव्हान दिलं आहे. यात ते म्हणतात, २४ तास झाले आहेत, मोदीजी. मी तुम्हाला आव्हान दिलं आहे. तुम्ही म्हणता की विरोधी पक्ष देशद्रोही आहे. तर मग कोणत्याही मंचावर एक जागा निवडा आणि माझ्याशी वादविवाद करा. आपण देशद्रोही कोण आहे? परकीय शक्तींशी कोणाचे संबंध आहेत? आणि कोणत्या प्रकारचे संबंध? शक्य तितक्या लवकर सोक्षमोक्ष लावून टाकू, घाबरू नका.

आपण दोघे भेटू. तिथे माध्यमं, देशातील तरुण असतील, एक टेबल असेल. तुम्ही एका बाजूला बसाल आणि मी दुसऱ्या बाजूला. तुम्हाला ज्याला न्यायाधीश म्हणून नेमायचे आहे, त्याला नेमा. मोहन भागवत यांना बसवा, या आणि मग आपण वादविवाद करू. यामध्ये आर्थिक प्रणाली, आर्थिक रचना, अमेरिकेशी करार कसा झाला? तो का झाला? तो इतक्या लवकर का झाला? फक्त तुम्हीच का त्यासाठी गेला होता? तुम्ही मंत्रिमंडळाला का कळवले नाही? अदानी प्रकरण का बंद केले? एपस्टाईन अशा अनेक गोष्टींवर उघडपणे चर्चा होईल. या, घाबरू नका.

योग्य-अयोग्य काय आहे ते बाजुला ठेवा, तुम्ही माझ्यावर आरोप करता, तर मग या सर्व काही स्पष्ट होऊन जाईल. तुम्ही इतर प्रकरणांवर माझ्यावर मानहानीचे खटले दाखल केले आहेत, जवळपास ४५ असे खटले माझ्यावर दाखल आहेत. पण तुम्ही माझ्या या परदेशी संबंधांच्या आरोपांवरुन तुम्ही माझ्यावर मानहानीचे खटले का दाखल करत नाहीत? कृपया तुम्ही कराच. आपण तिथेही उघडपणे चर्चा करू. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, मोदीजी. अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT