Sundar Pichai and Narendra Modi
Sundar Pichai and Narendra Modi  Sarkarnama
देश

गुगलच्या सुंदर पिचाईंना पद्मभूषण जाहीर अन् 24 तासांतच गुन्हाही दाखल

सरकारनामा ब्युरो

मुंबई : गुगलचे (Google) मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्मभूषण (Padma Awards) सन्मान जाहीर केला आहे. यानंतर 24 तासांतच म्हणजेच प्रजासत्ताकदिनी पिचाई यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. पिचाई यांच्याविरोधात मुंबईत हा गुन्हा दाखल झाला आहे.

केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली. यात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला या तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या भारतीयांच्या समावेश होता. या दोघांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले. परंतु, यानंतर 24 तासांतच मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पिचाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पोलिसांनी स्वामित्व हक्क कायद्याअंतर्गत (Copy Right Act) हा गुन्हा नोंदवला आहे. यात पिचाई यांच्यासह यूट्यूबचे (Youtube) व्यवस्थापकीय संचालक गौतम आनंद यांच्यासह गुगलच्या इतर अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल झाला आहे. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. (FIR against Google CEO Sundar Pichai)

या प्रकरणी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुनील दर्शन (Sunil Darshan ) यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यांनी बनवलेला चित्रपट यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे, अशी तक्रार होती. त्यानंतर न्यायालयाने मुंबई पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले होते. यानंतर एमआयडीसी पोलिसांनी पिचाई यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

याबाबत तक्रारदार सुनील दर्शन यांनी म्हटले आहे की, माझ्या 'एक हसीना थी एक दिवाना था' चित्रपटाचे स्वामित्व हक्क कोणालाही दिलेले नाहीत. तरीही या चित्रपटाची गाणी आणि व्हिडिओ अनेकांनी गुगल आणि यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत. यासाठी त्यांना यूट्यूब आणि गुगलनेही अपलोड करण्याची परवानगी दिल्याचे दिसत आहे. यातून त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले असून, चित्रपट निर्मात्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT