Kim Jong Un
Kim Jong Un File Photo
देश

उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला बळी अन् लाखो जण विलगीकरणात

सरकारनामा ब्युरो

सोल : जगभरात थैमान घातल्यानंतर कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. असे असताना उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. कोरिया सरकारने याची कबुली दिली होती. यानंतर कोरोना विषाणूचे उच्चाटन करण्यासाठी अध्यक्ष किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी देशात आणीबाणी घोषित केली आहे. पहिला रुग्ण सापडल्याची कबुली दिल्यानंतर आता 24 तासांतच कोरोनामुळे पहिला बळी गेल्याची माहिती कोरियाने दिली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत उत्तर कोरियात कोरोना संसर्ग झाल्याचे सरकारने मान्य केले नव्हते. देशात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसल्याचा दावा कोरियाकडून केला जात होता. नंतर कोरिया सरकारने देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याची कबुली दिली. यानंतर देशभरात कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. याला गंभीर राष्ट्रीय आणीबाणीचे नाव देण्यात आले आहे. यानंतर आता कोरिया सरकारने कोरोनामुळे पहिला बळी गेल्याची माहिती दिली आहे. याचबरोबर देशभरात सुमारे साडेतीन लाख नागरिकांना कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. त्यातील सुमारे 1 लाख 87 हजार जण विलगीकरणात आहेत.

जगभरात कोरोनाची साथ 2020 पासून सुरू झाल्यानंतर कोरियाच्या सीमांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार प्योगाँगमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. या रुग्णाला ताप आला होता. वैद्यकीय तपासणीत त्याला कोरोनाच्या ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, उत्तर कोरियात याआधीही कोरोनाचा संसर्ग झाल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु, कोरिया सरकारने त्यावेळी हे दावे फेटाळून लावले होते.

कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर सरकारने युद्ध पातळीवर पावले उचलली आहेत. किम जोंग यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोनाचे संकट रोखण्यासाठी देशभरात आणीबाणीची घोषणा करण्यात आली. कोरोना रोखण्यासाठी कठोर आणीबाणी लागू करण्याचे बैठकीत सांगण्यात आले. अतिशय कमी कालावधीत कोरोनाचे समूळ नष्ट करण्याचे ध्येय असल्याचे किम यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या संकटातून देश बाहेर पडेल, असा विश्वासही किम यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT