माझा दिल्लीत गॉडफादर नाही! हार्दिक पटेलांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

हार्दिक पटेलांच्या नाराजीमुळं काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर
Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News Updates, Hardik Patel Latest News in Marathi
Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News Updates, Hardik Patel Latest News in MarathiSarkarnama
Published on
Updated on

गांधीनगर : गुजरात (Gujarat) काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत नाराजी समोर आली आहे. प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पक्षावर टीकेची झोड उठवल्यानंतर राजकारण तापलं आहे. पटेल हे पक्ष सोडणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. यातच नुकतेच गुजरात दौऱ्यावर आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत पटेल यांनी मंचावर हजेरी लावली होती. यानंतर लगेचच पटेल यांनी पुन्हा एकदा पक्षाला इशारा दिला आहे. (Hardik Patel Latest News in Marathi)

गुजरातमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राहुल गांधी राज्यात दाखल झाले होते. हार्दिक पटेल हे पाटीदार समाजाचे ताकदवान नेते आहेत. ते नाराज असल्याने पक्षातील मतभेद उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर खुद्द राहुल गांधी यांच्यासोबत हार्दिक पटेल मंचावरही दिसले होते. त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा सुरू होती. यानंतर आता लगेचच पुन्हा एकदा हार्दिक पटेल यांनी पक्ष नेतृत्वाला आणि इतर नेत्यांना इशारा दिला आहे.

हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे की, माझा दिल्लीत कुणी गॉडफादर नाही. त्यामुळं मला काम करून दाखवावं लागेल. मला तुम्ही पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष बनवलं परंतु, माझ्या जबाबदारी काय असतील हे स्पष्ट केलं नाही. दोन वर्षे झाली तरी तुम्हाला माझ्या जबाबदाऱ्या निश्चित करता आलेल्या नाहीत. माझ्यासोबत राज्यातील नेत्यांनी अद्याप एकही मोठी पत्रकार परिषद घेतलेली नाही. विधानसभा निवडणूक सहा महिन्यांवर आली आहे. याचवेळी लोकांनाही माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे पक्षाने माझी जबाबदारी निश्चित करुन द्यावी.

Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News Updates, Hardik Patel Latest News in Marathi
चंद्रकांतदादांचा पुण्यात राष्ट्रवादीसह मनसेला दे धक्का!

अफवा या राजकारणातील अविभाज्य भाग असतात. राज्यातील काँग्रेसबाबतच्या माझ्या तक्रारी हा अंतर्गत विषय आहे. लवकरच त्यावर तोडगा निघेल, अशी आशा मला आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी यांच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण पक्षाने सापत्नभावाची वागणूक न देता जबाबदारीचे वाटप करायला हवे. जनतेसाठी काम करणाऱ्या आणि तळागाळात काम करण्याची इच्छा असणाऱ्या नेत्यांना संधी मिळायला हवी, असे पटेल यांनी स्पष्ट केलं.

Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News Updates, Hardik Patel Latest News in Marathi
मोठी बातमी : श्रीलंकेच्या माजी पंतप्रधानांसह इतर राजकारण्यांना न्यायालयाचा दणका!

काही दिवसांपूर्वी पटेल यांनी पक्षात दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप केला होता. नव्या नवऱ्याची नसबंदी केल्यासारखी माझी पक्षात अवस्था झाली आहे, असे वक्तव्य त्यांनी केलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारी अध्यक्षांनीच केलेल्या या आरोपांमुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र, काँग्रेस सोडण्याच्या चर्चेवर पटेल यांनी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केलं होतं. ते म्हणाले होते की, मी आतापर्यंत पक्षासाठी 100 टक्के योगदान दिलं आहे. यापुढेही पक्षात काम करत राहीन, असं सांगत पटेल यांनी काँग्रेस सोडण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com