Congress News Sarkarnama
देश

Congress News : भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस हायकमांडचं पहिलं पाऊल; इच्छुकांची यादी मागवली

Politics News : काँग्रेसची उमेदवारी निश्चित प्रक्रिया सुरू; १० जानेवारीपर्यंत नावे पाठविणार

Sachin Waghmare

Delhi News : राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. काँग्रेसच्या या बैठकीत उमेदवार व जाहीरनाम्याविषयी मंथन करण्यात आले. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी (Priynaka Gandhi) यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

इंडिया आघाडीत लोकसभेच्या एकूण 543 जागापैकी निम्म्याहुन अधिक जागा काँग्रेस पक्ष स्वतः लढवणार आहे. ज्या मतदारसंघात विजयी होण्याची संधी अधिक आहे, अशा जागांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यासाठी उमेदवारी निश्चित प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पहिल्यांदा प्राथमिक यादी सादर करण्याचे आदेश पक्षाच्या सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्षांना देण्यात आले आहेत.

या आठवड्यात सर्व राज्यातील छाननी समितीची बैठक घेतली जाणार आहे. त्यामध्ये उमेदवारांची छाननी प्रक्रिया सुरू करून उमेदवारीची पहिली यादी लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत जागा वाटप करून अंतिम चर्चा करण्यात आली.

यावेळी निवड समितीने संयोजक मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत (ashok gehlot), भूपेंद्र बघेल यांची समिती उमेदवार निवडीला अंतिम स्वरूप देणार आहे. त्यानंतर ही नावे पक्ष नेतृत्वाकडे सोपवले जाणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षाच्या जाहीरनाम्यावर बैठकीत चर्चा

राज्य व देशातील सर्व मतदार संघातील इच्छुकांची नावे १० जानेवारीपर्यत समितीने ही यादी सर्व प्रदेशाध्यक्षांना द्यावयाची आहेत. उमेदवारासोबतच पक्षाच्या जाहीरनाम्यावर बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे आता लवकरच काँग्रेसकडून उमेदवार फायनल केले जाण्याची शक्यता आहे.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT