Congress News : इंडिया आघाडीत काँग्रेस 'मोठा भाऊ' होणार; सर्व प्रादेशिक पक्षांना सोबत घेणार!

LokSabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजप 400 प्लस मिशन ठेवत वर्षभरापूर्वी तयारीला लागली होती.
INDIA Alliance
INDIA AllianceSarkarnama
Published on
Updated on

संजय परब-

Mumbai News : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मोठ्या आव्हानांचा मुकाबला करायचा असल्यास इंडिया आघाडीला भक्कमपणे एकजूट व्हावे लागणार आहे. विशेष म्हणजे यादृष्टीने आघाडीची पावले पुढे पडू लागली असून या आघाडीतील मोठा भाऊ असणाऱ्या काँग्रेसने आपल्या सोबतच्या सर्व प्रादेशिक पक्षांशी जुळवून घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप 400 प्लस मिशन ठेवत वर्षभरापूर्वी तयारीला लागली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नजरेखालून तयारीवर शेवटचा हात फिरवला जात आहे. मोदी यांच्यासह भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह ज्या ठिकाणी ताकद कमी पडत आहे, त्याच जागी आता आपली सर्व ताकद लावताना दिसत आहेत. सत्ताधारी कामाला लागले असताना विरोधकांच्या बाजूवर फक्त प्राथमिक चर्चा होताना दिसत होती.

INDIA Alliance
India Alliance : भाजपच्या हिंदुत्वाला कडवे आव्हान; आघाडीने भात्यातून काढला रामबाण, खेळणार हुकमी डाव!

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम 22 जानेवारीला होत असून या निमित्ताने भाजप आपल्या प्रचार प्रसाराचा जोरदार कार्यक्रम राबवत आहे. हे सर्व लक्षात घेता विरोधकांना एकजूट होणे गरजेचे असताना काँग्रेसने आतापर्यंतचे आपले वादविवाद बाजूला ठेवत प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेला सर्वच प्रादेशिक पक्षांकडून साथ मिळत आहे.त्यामुळे इंडिया आघाडी (INDIA Alliance) कदाचित आगामी काळात एनडीएपेक्षाही जास्त बलशाली होण्याची चिन्हं आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस (Congress)कडून दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी अर्थात आप पक्षासोबत जागावाटप केलं जाणार आहे.काँग्रेस महाराष्ट्रात शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसोबत जागावाटप करताना जुळवून घेणार आहे.तसेच झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन,तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांच्या पक्षासोबत, बिहारमध्ये जेडीयू आणि आरजेडी,उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव,पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तर केरळमध्ये डाव्यांसोबत काँग्रेस जुळवून घेणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

INDIA Alliance
Maratha Reservation : मनोज जरांगेंनी विचारला मुख्यमंत्र्यांना जाब..! गुन्हे मागे का घेतले नाही ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com