Flying Kiss Controversy News  Sarkarnama
देश

Flying Kiss Controversy : फ्लाईंग किस म्हणजे लव्ह जिहाद आहे का ? राऊतांचा सवाल ; 'राहुल गांधींनी मोहब्बत की दुकान..'

No Confidence Motion In Parliament : फ्लाईंग कीस हे गुलाबाचे फुल आहे.

सरकारनामा ब्यूरो

New Delhi : काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांच्या कथित फ्लाईंग किसवरून राजकारण तापलं आहे. राहुल गांधी यांच्या फ्लाईंग किसचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन केले आहे.

"ज्यांना प्रेमाची घृणा आहे. ज्याचे राजकारण द्वेषाच्या भाषणाने आहे, त्यांना फ्लाईंग कीस वेदनादायी वाटू शकते. राहुल गांधींनी संपुर्ण सदनाला म्हणजेच देशाला फ्लाईंग किस दिला. मोहब्बत की दुकान राहुल गांधी यांनी उघडलेलं आहे, फ्लाईंग कीस हे गुलाबाचे फुल आहे. फ्लाईंग किस म्हणजे लव्ह जिहाद आहे का ? असा सवाल राऊतांनी केला आहे.

अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत मोदी यांच्या भाषणाच्यावेळी गोंधळ झाला. त्यावर राऊत म्हणाले, "राहुल गांधी लोकसभेत बोलत असताना गोंधळ झाला नाही का.?. मी बोलायला उभा राहिलो तेव्हा माझा माईक बंद करण्यात आला,"

तुम्ही नेहरूंसमोर स्वत:ला खुजे समजत असल्याने सतत त्यांचे नाव घेत आहात, असा टीका संजय राऊतांनी केली आहे. नेहरूंनी देश घडवला, तुमच्याकडून तेही होत नाही म्हणूनच तुम्ही नेहरूंवर टीका करत आहात, अशी राऊतांनी मोदींवर तोफ डागली आहे.

राहुल गांधी यांच्या कथित फ्लाईंग किस वादावरुन गुरुवारी भाजपाने जोरदार आंदोलन केलं. भाजपाच्या एकूण 20 महिला खासदारांनी राहुल गांधी यांच्या या वर्तनाविरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे रीतसर तक्रार केली आहे. राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिली की, नाही? हे अजून सिद्ध झालेलं नाही.

हिसुआ मतदारसंघाचे काँग्रेस आमदार नीतू सिंह यांनी भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आमदार नीतू सिंह म्हणाल्या की, राहुल गांधींना मुलींची कमतरता नाही. जर त्यांना एखाद्याला 'फ्लाईंग किस' द्यायचे असेल तर तो स्मृती इराणींसारख्या ५० वर्षांच्या वृद्ध महिलेला फ्लाईंग किस का देतील ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT