Amul Co-op Milk Society
Amul Co-op Milk Society Sarkarnama
देश

Amul Co-op Milk Society : कॉंग्रेसच्या आणखी एका गडाला सुरुंग; 75 वर्षात पहिल्यांदाच 'अमूल'वर भाजपजी सत्ता

सरकारनामा ब्युरो

अमूल दूध सहकारी संस्थेवर भाजपला सत्ता मिळवण्यात यश आले आहे. गेल्या ७५ वर्षात पहिल्यांदाच भाजपकडे अमूलची सत्ता आली आहे. अमूलच्या संचालक मंडळात ११ पैकी नऊ संचालक कॉंग्रेसचे होते. त्यापैकी सात जणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळए कॉंग्रेसने अमूलची सत्ता गमावली आहे.

कॉंग्रेसच्या पाच सदस्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु केले होते. अखेर अमूलच्या संचालक मंडळातील उपाध्यक्ष राजेंद्रसिंह परमार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर गेल्या आठवड्यात इतर चार जणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपच्या सदस्यांची संख्या वाढली. गेल्या आठवड्यात भाजप नेते विपूल पटेल यांची अमूल संचालक मडंळाच्या अध्यक्षपदी आणि कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले क्रांती परमार सोढा यांची उपाध्यक्षपदी निुक्ती करण्यात आली. पटेल यांच्या निवडीतून भाजपने पटेल समुदायाला तर परमार यांच्या निवडीतून ओबीसी समूदायाला खूश करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

खरंतरं गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी आणंद आणि खेडा या दोन जिल्ह्यांमध्ये वर्चस्व असल्यामुळे त्याठिकाणी कॉंग्रेसला बहुमत होते. आणंद आणि खेडा येथील ग्राम सहकारी संस्थांमध्ये सात लाखाहून अधिक दूध उत्पादक आहेत. पण गेल्या काही वर्षात कॉंग्रेसने १५ दूध सहकारी संस्थांमधील सत्ता गमावली. त्यानंतर आता पुन्हा अमूलचीही सत्ता कॉंग्रेसच्या हातातून निसटली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT