Amit Shah : मुख्यमंत्री पदासाठी 'त्यांनी' विरोधकांचे तळवे चाटले; अमित शाहांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

Modi @ 20 Book : 'मोदी @ २०'च्या मराठी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Amit Shah in Pune : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते मोदी @ २० या पुस्तकाच्या मराठी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाबाबत शिंदे गटाचे अभिवंदन केले.

यावेळी शाह म्हणाले, "काल आपल्या युतीला मोठा विजय मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना खऱ्या शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे खूप अभिनंदन!" शिंदे यांचे अभिनंदन केल्यानंतर शाह यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर तीव्र शब्दात प्रहार केला.

Amit Shah
Amit Shah News : अमित शाहंनी टिळक कुटुंबीयांची भेट घेत केलं सांत्वन

शाह म्हणाले, "जे लोक खोट्याचा आधार घेऊन डरकाळ्या फोडत होते, त्यांना या निकालातून कळलं सत्य कोणाबरोबर आहे. निवडणुकीत मी भाजपचा अध्यक्ष होतो. बॅनरवर त्यांच्यापेक्षाही मोदींचे फोटो मोठे लावले जायचे. संपूर्ण निवडणूक फडणवीस यांना नेत मानून लढविली. मात्र मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षांचे तळवे चाटले."

Amit Shah
Thackeray vs Shinde : ठाकरे - शिंदे गटांनी आपल्या सोशल मीडियाच्या नावामध्ये केला मोठा बदल

यानंतर शाह यांनी धोका देणाऱ्यांना माफ करू नका, असे आवाहन केले. ते म्हणाले, "निवडणुकीत हार-जीत होत असते. मात्र धोका देणाऱ्यांना कधी माफ करू नका. तसे केले तर त्याचे भविष्यातही तसे वागण्याचे धाडस वाढत जाते. आमचे सोडा त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि पक्षालाही धोका दिला. निवडणूक आयोगाने 'दूध का दूध पानी का पानी' केले. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत सर्वच्यासर्व जागा युतीच्या असल्या पाहिजे."

Amit Shah
Election Commission News : निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देईल? कायदेतज्ज्ञ म्हणतात...

यावेळी शाह यांच्या हस्ते मोदी @ २० या पुस्तकाचा मराठी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रवासाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, देशाच्या लोकशाहीला कसे यशस्वी केले, त्याची गोष्ट वाचायची असेल तर मोदी @ २० पुस्तक वाचावे लागले.

हे पुस्तक मोदींचे जीवन, त्यांचा महिमा किंवा भाजपचा आलेख सांगणारे नाही. तर हे पुस्तक भारतातील समस्यांचे निराकरण आणि उज्ज्वल भविष्यातील वर जाणारी रेषा दाखविणारे आहे. मोदींना मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांची पूर्वीची ३० वर्षांची तपश्चर्या कारणीभूत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Amit Shah
Thackeray vs Shinde : ठाकरे - शिंदे गटांनी आपल्या सोशल मीडियाच्या नावामध्ये केला मोठा बदल

शाह म्हणाले, मोदीने २००१ ते २०१४ असे मुख्यमंत्री होते. त्या काळात गुजरातमध्ये विकासाची गंगा आणली. दहशतवादाला आळा घातला. यातून ते भाजपचे ब्रँड अम्बॅसिडर बनले. २०१४ ते २०२२ या काळात भारताने परिवर्तन पाहिले. मोदींनी देश विश्वगुरू बनेल अशा विश्वास दिला.

दीनदयाळ यांनी दोन लक्ष्य ठेवेल होते. सुरक्षीत व समृद्ध भारत व अंत्योदय. ते दोन्ही कामे झाले आहेत. आता भारत समृद्ध बनवायचे आहे. २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत ११ व्या स्थानावर होता, आता पाचव्या क्रमांक आहे. हे स्थान इंग्लडला मागे टाकून पटकाविल्याची माहितीही शाह यांनी यावेळी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com