Crime News Sarkarnama
देश

CM Grandson Death: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा संशयास्पद मृत्यू! मित्रांसोबत ट्रिपला गेलेला असताना घडली घटना

Former CM Grandson Death: मनालीमध्ये मित्रांसोबत तो ट्रिपला आला होता, या ठिकाणी तो आपल्या मित्रांसह एका होमस्टेला राहिला होता.

Amit Ujagare

Jharkhand Former CM Grandson Death: एका माजी मुख्यमंत्र्याच्या १९ वर्षाच्या नातवाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. हा तरुण हिमाचल प्रदेशात आपल्या मित्रांसोबत ट्रिपसाठी गेला होता. या ठिकाणी एका घरगुती निवासात त्यांनी मुक्काम केला, याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू नेमका कशामुळं झाला? नेमकं तिथं काय घडलं? जाणून घेऊयात.

नेमकं प्रकरण काय?

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा १९ वर्षीय नातू वीर सोरेन याच्याबाबत ही दुर्घटना घडली आहे. वीर सोरेन हा २२ फेब्रुवारी रोजी तो आपल्या काही मित्रांसोबत हिमाचल प्रदेशात ट्रिपसाठी गेला होता. इथं ते मनालीत पोहोचल्यानंतर तिथल्या सिमसा गावात त्यांनी एका घरगुती निवासात मुक्काम केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २३ फेब्रुवारी रोजी सोलंग आणि सेठन या पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर संध्याकाळी परतल्यानंतर ते पुन्हा सिमसा या गावात मुक्कामी थांबले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २४ फेब्रुवारी रोजी सकाळी त्याचे मित्र सकाळी बाहेर फेरफटका मारायला गेले आणि दुपारी १२.३० वाजता परतले. परतल्यानंतर त्यांना वीर सोरेन हा झोपलेला दिसला, मित्रांनी त्याला झोपेतून उठवलं तर त्यानं सांगितलं की, तीव्र स्वरुपात माझं डोकं दुखत आहे.

यानंतर वीरच्या मित्रांनी ऑनलाईन काही औषध मागवली, औषधं घेतल्यानंतर वीर पुन्हा झोपण्यासाठी गेला त्यानंतर दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास त्याच्या मित्रांना त्याच्या रुममधून काहीतरी जोरात पडल्याचा धप्प असा आवाज आला. त्यानंतर वीरचे मित्रांनी तातडीनं रुमकडं धाव घेतली तर वीर हा आपल्या बेडवरुन खाली पडलेला त्यांना दिसला. त्यानंतर त्याचे मित्रही घाबरले अशा अवस्थेतच त्यांनी त्याला स्थानिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केलं. पण हॉस्पिटलला नेत असताना वीरच्या तोंडातून फेस येत असल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितलं आहे. त्यानंतर हॉस्पटलमध्ये पोहोचल्यानंतर लगेचच डॉक्टर्सनं त्याला सीपीआर दिला पण काही वेळातच त्याची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यावेळी त्याच्या शरिरावर कुठल्याही स्वरुपाच्या जखमा आढळल्या नाहीत, अशी माहिती मनालीचे पोलीस उपअधीक्षक के. डी. शर्मा यांनी दिली.

चंपाई सोरेन यांनी दिली माहिती

दरम्यान, या घटनेची माहिती माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सर्वांना दिली. यात त्यांनी म्हटलं की, अत्यंत शोकाकूल अवस्थेत सर्वांना सांगू इच्छितो की, माझा प्रिय नातू वीर सोरेन २४ फेब्रुवारी २०२६ रोजी आकस्मित निधन झालं. हिमाचल प्रदेशातील मनाली इथं अचानक तब्येत बिघडल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण नियतीला वेगळंच काहीतरी मंजूर होतं. वीरच्या मृत्युमुळं आमचं कुटुंब कोसळलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलं सांत्वन

तसंच झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील या दुर्घटनेबाबत ट्विट करुन माहिती देताना म्हटलं की, आदरणीय चंपई सोरेन यांचे नातू वीर सोरेन याचा कुल्लू-मनाली इथं आकस्मित निधन झालं. विदंगत आत्म्याला शांती लाभो तसंच शोकाकुल कुटुंबाला या दुःखाच्या प्रसंगात सहन करण्याची शक्ती लाभो. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही या कुटुंबासोबत आहोत, असंही मुख्यमंत्री सोरेन यांनी पुढे म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT