Kiran Kumar Reddy Sarkarnama
देश

Congress : काँग्रेसला आणखी एक हादरा : मल्लिकार्जून खर्गेंना पत्र लिहित माजी मुख्यमंत्र्यांनी सोडला पक्ष

काही भाजप नेत्यांसोबत त्यांच्या बैठकाही झाल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

हैद्राबाद : आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) काँग्रेस पक्षाला (Congress) पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी (Kiran Kumar Reddy) यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. आधीच कुमकवत असलेली आंध्रातील काँग्रेस रेड्डी यांच्या राजीनाम्यामुळे आणखी कुमकवत झाली आहे. एकंदरीतच भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसला उभारी येईल, असे सांगितले जात असताना पक्षाला पुन्हा मोठे हादरे बसत आहेत. (Former Chief Minister of Andhra Pradesh Kiran Kumar Reddy quits Congress)

दरम्यान, रेड्डी हे भाजप नेत्याच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. तसेच, काही भाजप नेत्यांसोबत त्यांच्या बैठकाही झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. काँग्रेस पक्षाकडून रेड्डी यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याचे सांगितले जाते.

किरणकुमार रेड्डी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय मल्लिकार्जून खर्गे यांना पत्राद्वारे राजीनामा पाठविला आहे. त्यात त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आपला राजीनामा स्वीकारण्यात यावा, अशी मागणी केली आहे. काँग्रेस पक्ष सोडण्याचे कारण मात्र त्यांनी दिलेले नाही.

दुसरीकडे, काँग्रेस पक्षाने सर्वकाही देऊनही ज्यांनी पक्षाला संपविण्याचे काम केले आहे, त्यांनी आता भाजपमध्ये जावे, असा टोला मणिकम टागोर यांनी किरणकुमार रेड्डी यांना लगावला आहे.

किरणकुमार रेड्डी हे आंध्र प्रदेशमधील काँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री ठरले आहेत. ते २०१४ पर्यंत आंध्राचे मुख्यमंत्री होते. मात्र, रेड्डी यांनी १० मार्च २०१४ रोजी आंध्राच्या विभाजनाच्या निषेधार्थ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर रेड्डी यांनी जय साम्यक आंध्र पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर चार वर्षांनी ते काँग्रेस पक्षात परतले होते. मात्र, निर्णय प्रक्रियेत त्यांचा कोठेही समावेश नव्हता. त्यामुळे ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यातूनच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे पुढे येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT