former cji ranjan gogoi finally retires from rajya sabha  former cji ranjan gogoi finally retires from rajya sabha
देश

Ranjan Gogoi: अखेर माजी CJI रंजन गोगोई राज्यसभेतून निवृत्त! 6 वर्षात एकही विचारला नाही प्रश्न, एकदाच चर्चेत सहभाग

Ranjan Gogoi: रंजन गोगोई यांची राज्यसभेवरील नियुक्ती ही वादग्रस्त ठरली होती. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सरन्यायाधिशपदावरुन निवृत्त झाल्यानंतर गोगोई यांनी भाजपचं नॉमिनेशन स्विकारलं होतं.

Amit Ujagare

Ranjan Gogoi: माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई हे अखेर राज्यसभेतून आज निवृत्त झाले. त्यांच्या सरन्यायाधिशपदाच्या काळात आणि नंतर राज्यसभेवर जाण्याच्या निर्णयामुळं ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. पण राज्यसभेवर गेल्यानंतर त्यांनी तिथ काहीही केलं नाही, केवळ ६ वर्ष पद उपभोगलं आणि आता ते निवृत्त झाले आहेत. मग अशा व्यक्तीला राज्यसभेसारख्या वरिष्ठ सभागृहात भाजपनं का पाठवलं? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

रंजन गोगोईंची कामगिरी कशी राहिली?

रंजन गोगोई हे सहा वर्षानंतरच्या कार्यकाळानंतर राज्यसभेतून आज निवृत्त झाले. पण या सहा वर्षांच्या कालावधीत त्यांची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची राहिली आहे. सभागृहात त्यांची ५३ टक्के इतकी हजेरी होती. दुसरीकडं इतर खासदारांच्या उपस्थिती या जवळपास ८० टक्क्यांपर्यंत होत्या. इतकंच नव्हे तर खासदार असताना रंजन गोगोई यांनी एकही प्रश्न सभागृहात विचारला नाही. तसंच एकही खासगी विधेयक त्यांनी मांडलं नाही. तर विविध विषयांवर आणि विधेयकांवर जेव्हा राज्यसभेत चर्चा सुरु असतात, त्या चर्चांमध्ये त्यांनी केवळ एकदाच सहभाग नोंदवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT