Rajya Sabha Result: अखेर भाजपचा घोडेबाजार यशस्वी! ओडिशात काँग्रेस, बिजू जनता दलाचे ११ आमदार फोडले; भाजप समर्थित उमेदवाराचा विजय

राज्यसभा निवडणुकीत ओडिशातून भाजप समर्थक सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. पण यामागे काँग्रेस अन् बिजू जनता दलाच्या आमदारांचा मोठा वाटा असल्याचं आता समोर आलं आहे.
Rajya Sabha winning candidates third from left Manohan Samal, Chief Minister of Odisha Mohan Charan Majh, Indpendent Rajya Sabha candidate Dilip Ray and Sujeet Kumar celebrate their victory after the Odisha Rajya Sabha MP election in Bhubaneswar.

Published on
Updated on

Odisha Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत ओडिशातून भाजप समर्थक सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. पण यामागे काँग्रेस अन् बिजू जनता दलाच्या आमदारांचा मोठा वाटा असल्याचं आता समोर आलं आहे. चक्क ११ आमदार फुटल्यानं भाजपला हा विजय सोपा झाला. पण भाजपनं यासाठी घोडेबाजार केला असल्याची चर्च होती. क्रॉस वोटिंगसाठी काँग्रेस अन् बिजू जनता दलाच्या आमदारांना प्रत्येकी पाच कोटी रुपयांची ऑफर दिल्याप्रकरणी भाजपच्या दोन नेत्यांना पोलिसांनी अटकही केली होती.

Rajya Sabha winning candidates third from left Manohan Samal, Chief Minister of Odisha Mohan Charan Majh, Indpendent Rajya Sabha candidate Dilip Ray and Sujeet Kumar celebrate their victory after the Odisha Rajya Sabha MP election in Bhubaneswar.
Top 10 News: आव्हाडांनी दिलेल्या छत्रपती शिवरायांच्या संदर्भामुळं गदारोळ... ते बीडमध्ये घरातून उचलून नेत विवाहितेवर अत्याचार, रात्रभर चावडीला बांधून ठेवलं

ओडिशातील जागांसाठी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजप समर्थित ४ उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी झालेल्यांमध्ये मनमोहन समल, सुजीत कुमार, दिलीप रे, संतृत्प मिश्रा या चौघांचा समावेश आहे. पण या चौघांचा विजय हा काँग्रेसच्या 3 आणि बिजू जनता दलाच्या 8 अशा एकूण 11 आमदारांनी सोपा केला. कारण या आमदारांनी क्रॉस वोटिंग करत भाजपच्या उमेदवारांच्या पारड्यात मत टाकली त्यामुळं भाजपचे उमेदवार निवडून येऊ शकले.

Rajya Sabha winning candidates third from left Manohan Samal, Chief Minister of Odisha Mohan Charan Majh, Indpendent Rajya Sabha candidate Dilip Ray and Sujeet Kumar celebrate their victory after the Odisha Rajya Sabha MP election in Bhubaneswar.
Jitendra Awhad : आव्हाडांनी दिलेल्या छत्रपती शिवरायांच्या संदर्भामुळं गदारोळ; विधानसभेत सत्ताधारी आमदारांचा राडा; नेमकं काय घडलं?

दरम्यान, सोफिया फिरदौस या ओडिशातील पहिल्या मुस्लिम महिला आमदार ज्या काँग्रेसच्या तिकीटावर आमदार झाल्या आहेत. यांच्यासह रमेश जेना आणि दशरथी गोमांगो या काँग्रेसच्या तीन जणांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेसनं सोफिया यांना उमेदवारी विश्वास दाखवलेला असताना त्यांनी पक्षाविरोधातच भूमिका घेतल्यानं आता काँग्रेसकडून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com