देश

Congress leader death : काँग्रेसच्या माजी मंत्र्याचे निधन, 4 दिवसांपूर्वीच सुनावली होती 15 वर्ष जुन्या प्रकरणात 3 वर्षांची शिक्षा

Congress leader death after conviction : aकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्र्याचे निधन झाले आहे. त्यांना 15 वर्ष जुन्या प्रकरणात 3 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर अवघ्या चार दिवसांत त्यांचे निधन झाले.

Rashmi Mane

झारखंडच्या राजकारणातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री मन्नान मल्लिक यांचे मंगळवारी सकाळी रांची येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षासह झारखंडच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

मन्नान मल्लिक यांनी झारखंडच्या राजकारणात दीर्घकाळ सक्रिय भूमिका बजावली. वर्ष 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी धनबाद विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांना मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय आणि आपत्ती व्यवस्थापन या महत्त्वाच्या खात्यांचे त्यांनी नेतृत्व केले. मंत्री म्हणून काम करताना त्यांनी विकासकामे आणि जनहिताच्या विविध प्रश्नांवर विशेष भर दिला होता.

राजकीय कारकिर्दीपूर्वी मन्नान मल्लिक यांनी संघटनात्मक पातळीवरही मोठे काम केले. धनबाद जिल्हा काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाची बांधणी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच तत्कालीन बिहारचे मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

कामगार चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध होता. राष्ट्रीय कोलियरी मजदूर संघ आणि राष्ट्रीय कोलियरी मजदूर युनियनमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले होते.

त्यांच्या निधनापूर्वी अवघ्या काही दिवसांपूर्वीच त्यांचे नाव एका जुन्या न्यायालयीन प्रकरणामुळे चर्चेत आले होते. धनबादमधील बहुचर्चित मटकुरिया गोळीबार प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर निकाल दिला होता.

या प्रकरणात मन्नान मल्लिक यांच्यासह अनेक आरोपींना दंगल, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि जाळपोळ यांसारख्या आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र शिक्षा जाहीर झाल्यानंतर त्यांना आणि इतर दोषींना तत्काळ जामीनही मंजूर करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT