ST bus Fare Hike : एसटी प्रवाशांच्या खिशाला पुन्हा कात्री? प्रवाशांवर लवकरच पडणार भाडेवाढीचा बोजा? महामंडळाच्या 'त्या' प्रस्तावाने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार!

ST bus ticket price increase : महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या नव्या भाडेवाढ प्रस्तावामुळे प्रवाशांच्या खिशाला झळ बसू शकते. तिकीट दर किती वाढणार, प्रस्तावामागील कारणे आणि संभाव्य परिणाम जाणून घ्या.
ST bus Fare Hike : एसटी प्रवाशांच्या खिशाला पुन्हा कात्री? प्रवाशांवर लवकरच पडणार भाडेवाढीचा बोजा? महामंडळाच्या 'त्या' प्रस्तावाने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार!
Published on
Updated on

एसटीने प्रवास करताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच, राज्यातील एसटी प्रवाशांसाठी लवकरच प्रवास खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी भाड्यात सुमारे 13.50 टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, यावर आज होणाऱ्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास नव्या दरांनुसार प्रवाशांना अधिक भाडे भरावे लागणार आहे.

एसटी ही ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी एसटी सेवांचा वापर करतात. मात्र वाढता आर्थिक ताण आणि महसुलातील घट यामुळे महामंडळाने भाडेवाढीचा पर्याय स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ST bus Fare Hike : एसटी प्रवाशांच्या खिशाला पुन्हा कात्री? प्रवाशांवर लवकरच पडणार भाडेवाढीचा बोजा? महामंडळाच्या 'त्या' प्रस्तावाने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार!
Pune ZP : मोठी बातमी! पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य वाढणार; तब्बल सात जणांना मिळणार संधी, 'असे' असणार नवे राजकीय गणित

यंदाच्या प्रस्तावित भाडेवाढीत आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान तिकीट देताना सुट्ट्या पैशांच्या समस्येमुळे प्रवासी आणि वाहक यांच्यात अनेकदा वाद निर्माण होतात. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी नवीन तिकीट दर 5 रुपयांच्या पटीत निश्चित करण्याचा निर्णय प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे तिकीट व्यवहार अधिक सुलभ होतील आणि सुट्ट्या पैशांबाबत होणारे वाद टाळण्यास मदत होईल.

महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर गेल्या काही महिन्यांत मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः मे महिन्यात अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याने महसुलात घट झाली. राज्यातील 31 विभागांपैकी तब्बल 22 विभाग सध्या तोट्यात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय डिझेलच्या वाढत्या किमती, कर्मचाऱ्यांवरील वेतन आणि भत्त्यांचा वाढलेला भार तसेच टायर आणि इतर देखभाल खर्चामुळे एसटीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.

ST bus Fare Hike : एसटी प्रवाशांच्या खिशाला पुन्हा कात्री? प्रवाशांवर लवकरच पडणार भाडेवाढीचा बोजा? महामंडळाच्या 'त्या' प्रस्तावाने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार!
Sachin Ahir Politics : आदित्य ठाकरेंचे टेन्शन वाढले; वरळीच्या मैदानात सचिन अहिर उतरणार! जाहीर सभेत दिला शब्द, '...चमत्कार घडवणार'

या सर्व कारणांमुळे आर्थिक समतोल राखण्यासाठी आणि सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी भाडेवाढ आवश्यक असल्याचे महामंडळाचे मत आहे. मात्र दुसरीकडे आधीच वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या सामान्य प्रवाशांसाठी हा निर्णय अतिरिक्त आर्थिक भार ठरणार आहे.

आता सर्वांचे लक्ष आज होणाऱ्या बैठकीकडे लागले आहे. या बैठकीत अंतिम निर्णय झाल्यानंतरच सुधारित भाडे दर जाहीर केले जाणार असून, मंजुरी मिळाल्यास नवीन भाडेपत्रक लवकरच राज्यभर लागू होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com