Tamilnadu News: तामिळनाडूचे मुख्यमंत्री व टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी माजी मंत्री व डीएमकेचे आमदार अनिता राधाकृष्णन यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मद्रास उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम होती. मात्र,अखेर मद्रास उच्च न्यायालयाने अखेर त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
तामिळनाडूच्या राजकारणातून एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. माजी डीएमके मंत्री आणि विद्यमान आमदार अनिता आर. राधाकृष्णन यांना मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्याविरोधात कथितरित्या अपमानजनक आणि असभ्य टिप्पणी केल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
मद्रास उच्च न्यायालयाकडून आमदार अनिता आर. राधाकृष्णन यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्यांना अटक केली. राधाकृष्णन आपल्या मतदारसंघाला भेट देत असतानाच पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.
डीएमकेच्या माजी मंत्री राहिलेल्या अनिता आर. राधाकृष्णन यांच्या अटकेवेळी त्यांच्या कट्टर समर्थकांनी मोठ्या संख्येनं तिथे गर्दी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी पोलिसांच्या कारवाईविरोधात घोषणाबाजी केल्याचं दिसून आलं.
डीएमकेच्या माजी मंत्री अनिता राधाकृष्णन यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 352 (शांतता भंग करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर अपमान करणे) आणि 353 (2) (सार्वजनिक शांतता भंग करण्यास प्रवृत्त करणारी विधाने करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तामिळनाडूमधील तिरुचेंदूर विधानसभा मतदारसंघाच्या डीएमके आमदार अनिता राधाकृष्णन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी 20 जून रोजी एका जाहीर सभेत मुख्यमंत्री विजय यांच्याविरोधात कथितरित्या अपमानकारक टिप्पणी केली होती. यानंतर सत्ताधारी पक्ष टीव्हीकेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आता त्यावर कारवाई करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.