Rajiv Kumar  Sarkarnama
देश

Vote Chori : 'मत चोरी'च्या आरोपानंतर माजी निवडणूक आयुक्त देश सोडून पळाल्याची चर्चा, सत्य काय?

Former Election Commissioner Rajiv Kumar Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी मत चोरीचा मुद्दा मांडल्यानंतर 2024 ची लोकसभा निवडणूक घेणार निवडणूक आयुक्त राजीव कुमार परदेशात पळून गेले असल्याचे सोशल मीडियावर सांगितले जात आहे. नेमके सत्य काय ते समोर आले आहे.

Roshan More

Rajiv Kumar News : राहुल गांधी यांनी 'मत चोरी' होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यासंदर्भात पुरावे दिले. त्यानंतर सोशल मीडियावर देशात 2024 चे लोकसभा निवडणूक घेणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे देश सोडून पळून गेल्याची चर्चा आहे. ते युरोपामधील माल्टा या देशात स्थायिक झाल्याचे देखील काही सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र, राजीव कुमार हे खरेच देश सोडून गेले का? याचे सत्य समोर आले आहे.

2024 ची लोकसभा निवडणूक घेणारे राजीव कुमार हे फेब्रुवारी 2025 मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. राहुल गांधींनी मत चोरीच्या केलेल्या आरोपावर त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. मात्र, काही लोक आपल्याविषयी जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवत असल्याचे त्यांनी सांगितले. देश सोडून पळून गेल्याच्या अफवांवर कोणतेही स्पष्टीकरण त्यांनी दिले नाही. मात्र ते भारतातच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणूक आयुक्त म्हणून त्यांना दिल्लीच जे निवासस्थान मिळाले होते तिथेच अजुनही त्यांचा मुक्काम आहे. नियमानुसार सेवानिवृत्तीनंतर सरकारी निवास्थानी ते सहा महिने राहू शकतात. तसेच पुन्हा परवानगी घेत अधिक सहा महिने ते सरकारी निवास्थानी राहू शकतात.

राजीव कुमार हे 1984 बॅचचे बिहार-झारखंड बॅचचे IAS अधिकारी आहेत. 2020 मध्ये निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली 2024 च्या लोकसभा निवडणुका झाल्या तसेच 31 विधानसभा निवडणुका देखील त्यांच्या कार्यकाळात झाल्या. दरम्यान, ते 18 फेब्रुवारी 2025 ला सेवानिवृत्त झाले.

राहुल गांधी काढणार यात्रा

मत चोरी होत आहे तसेच बिहारमध्ये एसआयआरद्वारे मतदारांचे नाव मतदानयादीमधून कमी करण्यात येत असल्याच्या विरोधात राहुल गांधी बिहारमध्ये 'व्होटर अधिकार यात्रा' 17 ऑगस्टपासून काढणार आहेत. या यात्रेत सहभागी होण्याचे आव्हान त्यांनी बिहारच्या तरुणांना केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT