Shibu Soren Passes Away  sarkarnama
देश

Shibu Soren Passes Away : माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन, वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

Jharkhand EX CM Shibu Soren JMM : झारखंड राज्याच्या निर्मितीनंतर शिबू सोरेन हे तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री बनले. 2005, 2008, 2009 मध्ये त्यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा कार्यभार स्वीकारला.

Roshan More

Shibu Soren News : झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना व्हेंटिलिटरवर ठेवण्यात आले होते. त्यांचे पुत्र हेमंत सोरेन हे झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

झारखंड मुक्त मोर्चाची स्थापना शिबू सोरेने यांनी केले. त्यांचा जन्म 11 जानेवारी 1944 ला आत्ता झारखंड आणि तेव्हा बिहारचा भाग असलेल्या हजारीबाग येथे झाला. आदिवासीच्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलने केली. गुरुजी नावाने त्यांना ओळखले जात होते. आदिवासी समाजाचा बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. निवडणुकीच्या मैदानात ते पहिल्यांदा 1977 ला उतरले होते. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

1980 मध्ये ते लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. बिहारपासून झारखंड राज्य वेगळे निर्माण करण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेतृत्व देखील त्यांनी केले. झारखंड राज्य निर्माण होण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती.

तीन वेळा मुख्यमंत्री

झारखंड राज्याच्या निर्मितीनंतर शिबू सोरेन हे तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री बनले. 2005, 2008, 2009 मध्ये त्यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा कार्यभार स्वीकारला. मात्र, तीनही वेळा त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळात शिबू सोरेन हे केंद्रीय मंत्री होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT