Pervez Musharraf passes away  News
Pervez Musharraf passes away News  sarkarnama
देश

Pervez Musharraf : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन

सरकारनामा ब्युरो

Pervez Musharraf passes away News : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन झाले आहे. दुबईच्या रुग्णालयात त्यांनी आज (रविवारी) अंतिम श्वास घेतला. पाकिस्तानच्या माध्यमांनी हे वृत्त दिले आहे. ते 79 वर्षांचे होते.

अनेक दिवसापासून ते गंभीर आजाराने ग्रस्त होते. काही दिवसापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. यात ते व्हिल चेअरवर असल्याचे दिसले होते. एमाइलॉयडोसिस या गंभीर आजाराने त्रस्त असल्याने त्यांच्यावर गेल्या १० जूनपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.

त्यांचा जन्म ११ आँगस्ट १९४३ रोजी दरियागंज (नवी दिल्ली) येथे झाला होता. १९४७ मध्ये फाळणीच्या काही दिवस पूर्वी त्याच्या कुंटुबियांनी पाकिस्तान जाण्याचा निर्णय घेतला होता.

त्याचे वडील सईद हे पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयात कार्यरत होते. त्यांची बदली पाकिस्तानमधून तुर्की येथे झाली होती. ते १९४९ मध्ये तुर्की येथे गेले होते. काही दिवस परवेज मुशर्रफ हे त्यांच्यासोबत तुर्कीत होते. तेथे त्यांनी तुर्की भाषा शिकली होती.

महाविद्यालयीन जीवनात ते खेळाडू होते. १९५७ मध्ये त्यांचे कुटुंबिय पुन्हा पाकिस्तानात आले. त्यांचे शिक्षण कराची येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण लाहौर येथे झाले.

जनरल मुशर्रफ यांनी त्यांच्या 'इन द लाइन ऑफ फायर - अ मेमोयर' या चरित्रात कारगिल काबीज करण्याची शपथ घेतल्याचे लिहिले आहे. मार्च 2016 पासून ते दुबईत राहत होते. त्यांना पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावली होती.

कोण होते परवेज मुशर्रफ

  1. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या 21व्या वर्षी परवेझ मुशर्रफ पाकिस्तानी लष्करात कनिष्ठ अधिकारी म्हणून रुजू झाले.

  2. 1965च्या युद्धात ते भारताविरुद्ध लढले. या युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला. असे असतानाही शौर्याने लढल्याबद्दल मुशर्रफ यांना पाकिस्तान सरकारने पदक दिले होते.

  3. मुशर्रफ यांनी 1971 च्या युद्धातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे पाहून सरकारने त्यांना अनेकवेळा बढती दिली.

  4. 1998 मध्ये परवेझ मुशर्रफ जनरल झाले. भारताविरुद्ध कारगिलचा कट त्यांनी रचला. त्यात ते अपयशी ठरले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT