Meghalaya Election 2023 : मेघालयात सत्ताधारी NPP कडून जाहीरनाम्यात युवकांना मोठं आश्वासन

Assembly Election 2023 : नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
meghalaya election 2023 npp releases manifesto
meghalaya election 2023 npp releases manifestoSarkarnama

Assembly Election 2023 : येत्या २७ फेब्रुवारी रोजी मेघालय विधानसभेची निवडणूक (Meghalaya Assembly Election 2023) होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्याची घोषणा करीत आहे.

मेघालयमध्ये सत्तारुढ नॅशनल पिपल्स पार्टीने (NPP)ने सत्ता राखण्यासाठी आपल्या जाहीरनाम्यात विविध घोषणा केल्या आहेत. येत्या पाच वर्षात पाच लाख युवकांना नोकरी देणार असल्याचे आश्वासन एनपीपीने दिले आहे. एनपीपीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मुख्यमंत्री कोनराड के. संगमा यांनी जोवई येथे हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी येत्या पाच वर्षात ५ लाख जणांना रोजगार, नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यात कृषीक्षेत्र, डिजिटल क्षेत्रातील नोकऱ्यांचा समावेश असेल, असे मुख्यमंत्री संगमा यांनी माध्यमांना सांगितले. शहर आणि ग्रामीण भागात या नोकऱ्या उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

meghalaya election 2023 npp releases manifesto
ZP News : झेडपी-पंचायत समित्यांच्या माजी सदस्यांना निवडणुकीचे वेध ; पुण्यात मंथन परिषद

नोकरी मेळावे, असंघटीत कामगारांना रोजगार, त्यांना उपजीविकेसाठी साधन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. क्रीडाक्षेत्रातील पायाभूत सुविधा उपलद्ध करुन देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सरकारी योजनांसाठी माहिती मिळण्यासाठी ग्रामीण भागात १ हजार सुविधा केंद्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. रस्त्यांचा विकास, स्वस्त औषधी उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्वासन एनपीपीने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे.

भाजपनेही आपल्या सर्व ६० जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ फेब्रुवारी रोजी मेघालयाच्या दौऱ्यावर आहेत.न निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक काळात मेघालयामध्ये मोदींच्या सभा, रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com