Manmohan Singh Sarkarnama
देश

Manmohan Singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल केलं; प्रकृती चिंताजनक

Manmohan Singh latest updates : मनमोहन सिंग हे सध्या 92 वर्षांचे आहेत. मागील काही महिन्यांपासून ते आजारी आहेत.याआधी देखील त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

Deepak Kulkarni

New Delhi News : देशाचे माजी पंतप्रधान व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना गुरुवारी (ता.26) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मनमोहन सिंग हे सध्या 92 वर्षांचे आहेत. मागील काही महिन्यांपासून ते आजारी आहेत.याआधी देखील त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.आता त्यांना पुन्हा एकदा तब्येत बिघडल्यामुळे तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केलं आहे.डॉक्टरांची एक टीम सिंग यांच्यावर उपचार करत आहे.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या 2004 ते 2014 या काळात मनमोहन सिंग यांनी सलग दोनवेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवले होते. त्या अगोदर सिंग यांनी पी.व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या सरकारमध्ये अर्थखात्याची जबाबदारी सांभाळली होती.

काँग्रेसचे प्रमुख नेत्या सोनिया गांधी यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा जन्म पंजाबमधल्या गाह (आता पाकिस्तान) 1932 मध्ये झाला. त्यांनी ऑक्सफर्ड आणि केंब्रीज विद्यापीठातून अर्थशास्त्राचं शिक्षण पूर्ण केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT