Ramtek bungalow : कुणालाच नको असेल तर 'रामटेक' मला द्या, आणखी एका मंत्र्याची वादात उडी; नेमका काय आहे बंगल्याचा इतिहास ?

Ramtek Political dispute : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना मिळाला असला तरी ते हा बंगला पंकजा मुंडेंसोबत अदलाबदल करणार असल्याची चर्चा असतानाच आता या वादात तिसऱ्याच मंत्र्याने उडी घेतली आहे.
Pankaja Munde, Bawankule
Pankaja Munde, BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात सध्या राजकीय घडामोडी वेगात सुरू आहेत. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर लगेचच मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले. खातेवाटप मार्गी लागल्यानंतर नवे मंत्री त्यांच्या मतदारसंघांमध्ये परतले आहेत. त्यातच आता एकीकडे पालकमंत्रिपदाची माळ पदरात पडावी यासाठी महायुतीमधील तीन घटक पक्षात सध्या जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे दालन व बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे.

मलबार हिल परिसरातला सी-फेसिंग असणारा रामटेक हा बंगला कुणालाही हवासा वाटणारा आहे. पण सध्या हा बंगला मंत्र्यांना त्या बंगल्याचा पूर्वीचा इतिहास पाहता नकोसा वाटू लागल्याची चर्चा आहे. हा बंगला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना मिळाला असला तरी ते हा बंगला पंकजा मुंडेंसोबत अदलाबदल करणार असल्याची चर्चा असतानाच आता या वादात तिसऱ्याच मंत्र्याने उडी घेतली आहे.

मलबार हिल परिसरातील रामटेक हा बंगला. देवगिरी बंगला आणि सागर बंगला यांच्याबरोबर मध्यभागी आहे. त्यामुळे या दोन्हीपासून 'समान अंतर' राखून असणारा हा बंगला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना मिळाला आहे. पण बावनकुळेंना रामटेकऐवजी दुसरा बंगला हवा आहे. बावनकुळेंकडून हा बंगला अदलाबदल करण्याची चर्चा सुरू आहे. हा बंगला पंकजा मुंडे यांना देण्यास तयार असून ते या बंगल्याची अदलाबदल करणार असल्याचे समजते. तर दुसरीकडे रामटेक बंगला घेण्याची मुंडेंचीही तयारी असल्याची माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे.

Pankaja Munde, Bawankule
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुखांच्या हत्येविरोधातील एल्गारात शरद पवारांनंतर हा नेता होणार सहभागी

एकीकडे ही चर्चा सुरू असताना रामटेक बंगल्यावरच्या चर्चेत आणखी एका मंत्र्यांचे नाव पुढे आले आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (shivsena) मंत्री संजय शिरसाट यांनी रामटेक बंगला घेण्याची तयारी दर्शवली आहे. , हा बंगला कुणालाच नको असेल तर मला द्या, मी जातो तिथे राहायला. आम्हाला फ्लॅट दिलेत, पण कुठे ना कुठे अॅडजस्टमेंट करावी लागते, असे म्हणत त्यांनी तयारी दर्शवली आहे.

Pankaja Munde, Bawankule
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुखांच्या हत्येविरोधातील एल्गारात शरद पवारांनंतर हा नेता होणार सहभागी

त्यामुळे आता येत्या काळात रामटेक बंगला चंद्रशेखर बावनकुळे की पंकजा मुंडे यांना देण्यात येणार याची उत्सुकता लागली आहे. आता शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून ही रामटेक बंगला देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काळात या बंगल्यात नेमकं कोण मुक्काम करणार पाहणे हे महत्वाचे ठरणार आहे.

Pankaja Munde, Bawankule
Pankaja Munde : "तो माझ्यासोबत काम करत होता..." संतोष देशमुख हत्या प्रकरणी पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

रामटेक बंगल्याचा काय आहे इतिहास...

1995 साली रामटेकमध्ये विलासराव देशमुख यांचे वास्तव्य असतानाच त्यांना लातूर विधानसभा मतदार संघातून मोठा पराभव झाला होता. त्यानंतर आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना हा बंगला मिळाला. त्यानंतर तेलगी प्रकरणात भुजबळांचे नाव समोर आले. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

त्यानंतर २०१४ साली महसूल मंत्री असताना एकनाथ खडसेंना हा बंगला मिळाला. त्याच वर्षी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांना बंगल्यासोबतच मंत्रिपदावरही पाणी सोडावे लागले होते. त्यानंतर शिंदे सरकारमध्ये असलेल्या दीपक केसरकर यांना हा बंगला मिळाला होता. त्यामुळेच नव्या सरकारच्या मंत्रिमंडळातून दीपक केसरकरांना डच्चू मिळाला. त्यामुळे हा रामटेक बंगल्याचा इतिहास पाहता हा बंगला कोण घेणार? याची उत्सुकता लागली आहे.

Pankaja Munde, Bawankule
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचे मोठे विधान, म्हणाल्या, 'पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी पीएम मोदींची....'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com