Rahul Gandhi 2 Sarkarnama
देश

Rahul Gandhi Over Sikh Statement : अशोक गेहलोतांनी जेपी नड्डांना सुनावलं, 'मकसद कभी पूरा नहीं होने देंगे'

Pradeep Pendhare

Mumbai News : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा अमेरिका दौऱ्यातील विधानांचा वेगवेगळा अर्थ काढत तीन दिवसांपासून भाजप राहुल यांच्याविरोधात देशात वातावरण निर्मितीचा प्रयत्न करत आहेत. पण त्यात त्यांना यश येईना. यातच भाजपचा दिल्लीतील माजी आमदार राहुल गांधींना उघडपणे जीवे मारण्याची धमकी देतो, यावर त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचे मौन आश्चर्यकारक आणि गंभीर आहे, पण भाजपचा हेतू कधीच पूर्ण होऊ देणार नाही", असा इशारा राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिला.

दरम्यान, राहुल गांधींना जीवे मारण्याच्या धमकीवरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून, मुंबईसह देशभर भाजपविरोधात आंदोलनाचा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे.

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात देशातील धर्मावर भाष्य करताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, काही धर्म, भाषा आणि समुदायांना इतरांपेक्षा कनिष्ठ मानतो, असं म्हणत राहुल गांधी यांनी तिथं कार्यक्रमात सहभागी झालेल्या शीख समाजातील व्यक्तीला नाव विचारात देशातील धर्मावर टिप्पणी केली. त्यावरून भाजपने दिल्लीत राहुल गांधीविरोधात आंदोलन केलं. या आंदोलनात भाजपचे माजी आमदार तरविंदर सिंह मारवाह यांनी राहुल गांधी यांना 'तेरी भी हालत दादी जैसी होगी', असा इशारा दिला. यावरून भाजपविरोधात काँग्रेस देशभर आक्रमक झाली आहे.

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यावरून भाजप (BJP) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना चांगलच, सुनावलं.'मकसद कभी पूरा नहीं होने देंगे', असे म्हणत राहुल गांधी यांची बदमानी गेल्या 15 ते 20 वर्षांपासून भाजपकडून सुरू आहे. 'देशाला राहुल गांधी यांचं सामाजिक न्याय तत्व समजलं आहे. त्यामुळे भाजपच्या या बदमाशीला देश आता बळी पडताना दिसत नाही. त्यातून भाजपला नैराश्य आलं आहे. यातून आता भाजपचे माजी आमदार, आता राहुल गांधींना मारण्याची उघडपणे भाषा करत आहेत. या सर्वावर भाजपचे पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांचे मौन आश्चर्यकारक आहे', असे अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे.

गेहलोत यांचा भाजपला सल्ला

"भाजप सत्ता टिकवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे संपूर्ण देशाला कळू लागले आहे. राहुल गांधी यांचा अमेरिकेचा दौरा यशस्वी होत असल्याने भाजपची पोटदुखी वाढली आहे. संविधान बदलून आरक्षण हटवण्याच्या हेतूने लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या भाजपला जनतेने चांगलाच धडा शिकवला. तरी देखील भाजप आरक्षणावर खोटे बोलण्याचे सोडत नाही. समाजात समानता आणण्यासाठई आरक्षण आवश्यक असून, गरजेनुसार त्याची मर्यादा वाढवावीच लागेल, असं राहुल गांधींची भूमिका असून, त्यांच्या योग्य भूमिकेमुळे भाजपमध्ये नैराश्य आलं आहे. यातूनच भाजप देशाची दिशाभूल करत आहे आणि आता त्यांनी ते प्रयत्न थांबवावेत", असा सल्ला अशोक गेहलोत यांनी भाजपला दिला.

मुंबईत काँग्रेसची निदर्शनं

राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा भाजपचा माजी आमदार असल्याचा आरोप करत, भाजपच्या द्वेषी राजकारणाविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबईत काँग्रेस, भाजपविरोधात ठिकठिकाणी मुंबई काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज निदर्शनं करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT