सिमला : हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का बसला आहे. माजी मंत्री व हिमाचल भाजपचे (BJP) माजी प्रदेशाध्यक्ष खिमी राम शर्मा यांनी मंगळवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मागील काही दिवसांपासून ते पक्षावर नाराज होते. (Congress Latest Marathi News)
प्रदेश काँग्रेसचे प्रभारी राजीव शुक्ला यांनी शर्मा यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले. शर्मा हे दोनवेळा आमदार राहिले आहेत. तसेच धुमल सरकारमध्ये ते वन मंत्रीही होते. 1999 मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक पहिल्यांदा लढवली होती. त्यानंतर ते कुल्लू जिल्हा परिषदेचे अध्यक्षही बनले.
माजी मंत्री असलेले शर्मा भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. पण 2017 च्या निवडणुकीत पक्षाने त्यांचं तिकीट कापलं. त्यानंतर त्यांना पक्षानं पुर्णपणे दुर्लक्ष केले होते. त्यांच्याकडे कोणतंही पद देण्यात आलं नव्हतं. सरकारमध्येही ते दुर्लक्षित राहिले. त्यामुळे ते मागील अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज होते.
अखेर शर्मा यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बंजार विधानसभा क्षेत्रात शर्मा यांची पकड असल्याचे मानले जाते. त्यामुळे या भागात काँग्रेसची ताकद वाढणार आहे. हिमाचलमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.