C. M. Ibrahim
C. M. Ibrahim sarkarnama
देश

कर्नाटकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का ; माजी केंद्रीय मंत्र्याची पक्षाला सोडचिठ्ठी

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पाच राज्यातील निवडणुकीत काँग्रेसला (congress)दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यातच आता कर्नाटकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे निकटवर्तीय मानले जाणारे कर्नाटकमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सी. एम. इब्राहिम (C. M. Ibrahim)यांनी राजीनामा दिला आहे.

सी.एम. इब्राहिम केंद्र सरकारमध्ये नागरी हवाई वाहतूक मंत्री होते. २००८ मध्ये त्यांनी सिद्धारामय्या यांच्यासोबत जेडीयू सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

कॉग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना त्यांनी पत्र लिहून त्यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. ''गेल्या १२ वर्षांमध्ये पक्षातील समस्यांबाबत मी तुम्हाला अनेक पत्रं लिहिली आहेत. त्यांचे उत्तर देताना तुम्ही समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपाय केले जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र आतापर्यंत मला कुठलाही बदल दिसला नाही. त्यामुळे मी काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व तत्काळ प्रभावाने सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

''सिद्धारमैय्यांसाठी आणि त्यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी मी काँग्रेसमध्ये आलो होतो. मात्र आता काँग्रेस माझ्यासाठी बंद आध्याय बनला आहे,'' असे त्यांनी सांगितले आहे. काँग्रेस आणि सिद्धारामय्या यांच्यावर गेल्या काही काळापासून ते नाराज होते. कर्नाटकच्या विधान परिषदेमध्ये रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदावर निवड होईल, असे त्यांना वाटत होते. विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने बी. के. हरिप्रसाद यांची निवड केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले होते.

पाच राज्यातील निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्यानंतर गांधी कुंटुबीय राजीनामा देणार याची सध्या राजकीय पटलावर चर्चा सुरु आहे. गांधी कुंटुबीय खरंच राजीनामा देणार का ही अफवा आहे, हे काही तासातच समजणार आहे. पाच राज्यांमधल्या निकालांवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

कॉग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi)आणि प्रियंका गांधी पक्षातील पदाचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीने नुकतेच दिले आहे. यामुळे कॉग्रेसच्या गोटात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

याबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यावर खुलासा केला आहे. हे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्ट केलं आहे. कॉग्रेसमधील नाराज जी-२३ (G-23)पुन्हा सक्रिय झाले आहे. कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आजाद यांच्या घरी 'जी २३' नेत्यांची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत नव्या अध्यक्षांची मागणी करण्यात आल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT