Dara Singh Chauhan
Dara Singh Chauhan Sarkarnama
देश

अखिलेश यांचा भाजपला चकवा; बड्या नेत्याला पक्षात प्रवेश देत दिला धक्का

सरकारनामा ब्युरो

लखनौ : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी भाजपमधील एकाही नेत्याला प्रवेश देणार नसल्याचे शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपला शब्द फिरवत भाजपला चकवलं आहे. उत्तर प्रदेशातील बड्या नेता व माजी मंत्र्याला पक्षात प्रवेश देत त्यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे आता भाजपमधून समाजवादी पक्षात येणाऱ्या मंत्र्यांची संख्या तीनवर गेली आहे.

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) तोंडावर भाजपला मोठी गळती लागली आहे. भाजपच्या (BJP) दोन मंत्र्यांसह काही आमदारांनी दोन दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षात (Samajawadi Party) प्रवेश केला आहे. माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) व धरम सिंग सैनी यांचाही त्यात समावेश आहे. मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर दोन मंत्र्यांसह सहा जणांनी भाजपला रामराम ठोकला आहे.

माजी मंत्री व पुर्वांचलमधील बडा नेता म्हणून ओळख असलेले दारा सिंह चौहान (Dara Singh Chauhan) यांनीही रविवारी कमळ सोडून अखिलेश यांचा हात धरला. अखिलेश यांच्या उपस्थितीत चौहान यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यांनी काही दिवसांपूर्वीच सपामध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. या पक्षप्रवेशानंतर चौहान यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 2017 मध्ये सत्तेत आल्यानंतर सबका साथ सबका विकासचा नारा देण्यात आला होता. पण सगळ्यांची सोबत घेत काहींचा विकास करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, भाजपला धक्के देत समाजवादी पक्षाने फोडाफोडीच्या राजकारणात मोठी आघाडी घेतली आहे. अनेक भाजप नेते समाजवादी पक्षात दाखल होत आहेत. आता यापुढे भाजप नेत्यांना पक्षाचे दरवाजे बंद करण्याची घोषणा अखिलेश यादव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली होती. भाजपचा कोणाताही आमदार, मंत्री यांना मी पक्षात घेणार नाही. भाजपला कुणाचे तिकिट नाकारायचे असेल ते नाकारू द्या, असे यादव म्हणाले होते.

शुक्रवारी समाजवादी पक्षाच्या कार्यालयासमोर झालेला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम वादात अडकला आहे. समाजवादी पक्षाकडून या कार्यक्रमाला व्हर्चुअल सभा असे नाव दिले होते. पण प्रत्यक्षात या कार्यक्रमाला हजारो कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. त्यामध्ये कोरोनाच्या (Covid19) नियमांचे पालनही करण्यात आले नाही. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. पोलिसांनाही या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT